नवी दिल्ली, 4 जानेवारी : हॅकर्स अनेक मार्गांनी लोकांची फसवणूक करुन बँक अकाउंटमधून पैसे चोरी करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हॅकर्स ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातूनही पैशांची चोरी करतात. ऑनलाइन गेमिंगमध्ये अधिकतर लहान मुलं आणि तरुण वयोगटातील मुलांचा समावेश आहे. त्यामुळे अशा मुलांना हॅकिंग किंवा बँक अकाउंटबाबत योग्य ती माहिती नसल्याने हॅकर्स सहजपणे या मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे ऑनलाइन गेमिंगवेळी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं.
मुलांना ऑनलाइन गेमिंगपासून जितकं लांब ठेवता येईल तितका प्रयत्न करा. ऑनलाइन गेमिंग वेळी गेममध्ये सांगिल्याप्रमाणे, गेमच्या सुचनांनुसार मुलं वागतात. त्यामुळे गेमकडून पैशांची मागणी किंवा एखादं टूल खरेदी करण्याबाबत सांगण्यात आल्यास मुलं थेट बँक अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करतात. तसंच ऑनलाइन गेमिंगवेळी हॅकर्सदेखील अॅक्टिव्ह राहून गेममधून पैशांची मागणी करतात. असे मोठे फ्रॉड, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
काय काळजी घ्याल?
लहान मुलांना फोन गेमिंगसाठी देताना तुमचा असा फोन देऊ नका जो बँक अकाउंटशी लिंक आहे. त्याशिवाय मुलांना ऑनलाइन फ्रॉड आणि सेफ्टी संबंधित माहिती देणं गरजेचं आहे. जेणेकरुन एखादा स्कॅम ते ओळखू शकतील.
क्रेडिट कार्डमध्ये लिमिट ठरवण्यासाठीचं फीचर दिलेलं असतं. त्यामुळे इंटरनॅशनल ट्रान्झेक्शनसाठी हे लिमिट अतिशय कमी 500 किंवा 1000 रुपये करुन ठेवा. यामुळे चुकूनही मोठं मोठं नुकसान होणार नाही.
अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तुमचा डेटा लीक करतात. त्यामुळे तुमचे बँक डिटेल्स कार्ड नंबर, पासवर्ड ऑनलाइन सेव्ह करू नका. Google Play Store वरुन एखादं App खरेदी करताना सावध व्हा. प्लेस्टोर तुमचे बँक डिटेल्स सेव्ह करतं. त्यामुळे cvv टाकल्यानंतर पेमेंट होतं. त्यामुळे असे बँक डिटेल्स लगेच रिमूव्ह करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.