जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / IMEI Number द्वारे शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन; हा आहे सोपा मार्ग

IMEI Number द्वारे शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन; हा आहे सोपा मार्ग

त्यानंतर Add more complaint वर क्लिक करावं लागेल, ज्यात मोबाईलच्या मालकाचं नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आयडेंटिटीची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल. वेरिफिकेशनसाठी तुमच्या नंबरवर एक OTP येईल, त्यानंतर वेरिफिकेशन होईल. याप्रमाणे फायनल सबमिट करुन मोबाईल फोन ब्लॉक होईल. तसंच फोनबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, ती युजरकडे पोहोचवली जाईल.

त्यानंतर Add more complaint वर क्लिक करावं लागेल, ज्यात मोबाईलच्या मालकाचं नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आयडेंटिटीची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल. वेरिफिकेशनसाठी तुमच्या नंबरवर एक OTP येईल, त्यानंतर वेरिफिकेशन होईल. याप्रमाणे फायनल सबमिट करुन मोबाईल फोन ब्लॉक होईल. तसंच फोनबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, ती युजरकडे पोहोचवली जाईल.

मोबाईल हरवल्यानंतर तो शोधण्यासाठी IMEI नंबरची आवश्यकता असते. या नंबरमुळे मोबाईल फोन ट्रॅक करण्यास मदत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 एप्रिल : जगभरात जवळपास 7 कोटीहून अधिक मोबाईल फोन्स हरवत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली. या हरवलेल्या फोनमध्ये चोरी झालेल्या, एखाद्या ठिकाणी विसरलेल्या फोनचाही समावेश आहे. GPS लोकेशन आणि इंटरनेट एक्सेस न झाल्याने फोन मिळत नाही. आजकाल स्मार्टफोन म्हणजे केवळ फोटो, गाणी, व्हिडीओसाठी वापरला जात नाही, तर सर्वच खासगी डिटेल्स, कागदपत्र, बँक डिटेल्स फोनमध्ये ठेवले जातात. अनेक बँक खाती, सोशल मीडिया अकाउंट्सही फोनमध्ये सेव्ह असतात. अशात फोन हरवल्यानंतर या माहितीचाही गैरवापर होण्याची शक्यता असते. मोबाईल हरवल्यानंतर तो शोधण्यासाठी IMEI नंबरची आवश्यकता असते. या नंबरमुळे मोबाईल फोन ट्रॅक करण्यास मदत होते. अँड्रॉईड फोनमध्ये हा IMEI Number मिळवण्यासाठी, मोबाईल फोनमध्ये एक कोड डायलपॅडमध्ये टाईप करुन कॉल बटण दाबावं लागेल. *#06# डायल करुन तुमच्या फोनचा IMEI Number मिळेल. तसंच अँड्रॉईड मोबाईल फोनमधील सेटिंग्जमध्ये About Phone वर क्लिक करुनही हा नंबर मिळू शकतो. फोनच्या पॅकेजिंगवरही हा नंबर असतो.

(वाचा -  आश्चर्यच आहे! वर्षभर पाण्यात राहूनही चालू स्थितीत राहिला iPhone 11 Pro Max )

IMEI नंबरने कसा ट्रॅक होतो मोबाईल? IMEI Number (International Mobile Equipment Identity) हा एक 15 अंकी कोड असतो, जो GSMA कडून अधिकृत असतो. हा नंबर तुमच्या फोनचं ओळखपत्र असतं, असंही बोलता येऊ शकतं. एका फोनचा, एखाद्या नेटवर्कवर कॉल रिसिव्ह करण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी आणि मेसेज मिळवण्यासाठी फोनचा वापर होतो, त्यावेळी IMEI Number आपोआप ट्रॅक होतो.

(वाचा -  इथे पोस्ट करा वॅक्सिनेशनचा फोटो आणि जिंका 5 हजार रुपये;वाचा भारत सरकारची खास ऑफर )

त्याशिवाय अनेक लोक आपल्या फोनमध्ये ब्लूटूथ ट्रॅकर GPS लोकेटरचाही वापर करतात, ज्याद्वारे स्मार्टफोन लोकेट केला जाऊ शकतो. परंतु यामुळे काही अंतरापर्यंतच फोन ट्रॅक होऊ शकतो.

(वाचा -  लाखोंमध्ये एखादीच होते अशी गडबड;2 लाख रुपयांत विकला गेला अनोख्या डिझाईनचा iPhone )

IMEI नंबर बदलता येऊ शकतो का? IMEI नंबर बदलला जाऊ शकतो. फोन चोरी झाल्यानंतर या नंबरने तो ट्रॅक करता येत नसल्यास, तो बदलला गेल्याची शक्यता असते. Flasher द्वारे मोबाईल फोन कम्प्यूटरला कनेक्ट करुन IMEI Number मॉडिफाय करुन बदलला जातो. हा नंबर ब्लॉकही केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात