• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • आश्चर्यच आहे! वर्षभर पाण्यात राहूनही चालू स्थितीत राहिला iPhone 11 Pro Max

आश्चर्यच आहे! वर्षभर पाण्यात राहूनही चालू स्थितीत राहिला iPhone 11 Pro Max

फोन पाण्यात पडला तर बहुतांश जण त्याची आशाच सोडून देतात. याबाबत तैवानच्या (Taiwan) एका पर्यटकाला आलेला अनुभव मात्र विलक्षण असून, त्याचा वर्षभरापूर्वी तलावात पडलेला आयफोन (iphone) त्याला सापडला असून, हा फोन चक्क व्यवस्थित चालू आहे.

  • Share this:
तैवान, 13 एप्रिल : आजकाल मोबाईलशिवाय (Mobile) राहणारी व्यक्ती शोधूनही सापडणं कठीण आहे. आजकाल फोनवरून अनेक कामं केली जातात. त्यामुळे प्रत्येकाला अत्याधुनिक फीचर्सनी सुसज्ज असा फोन हवा असतो. यामध्ये उत्तम कॅमेरा, बॅटरी यासह वॉटरप्रुफ फोन अशा अनेक फीचर्सचा समावेश असतो. आजकाल मोबाईल निर्मात्या कंपन्याही असे नवनवीन फीचर्स असलेले फोन दाखल करत असतात. वॉटरप्रुफ फोन हे फीचर आता महागड्या आणि मध्यम किमतीच्या स्मार्टफोनमध्ये असतं. त्यामुळे फोन पाण्यात पडला तरी काळजी नसते. अर्थात सगळ्याच स्थितीत हे फीचर काम करेल अशी शाश्वतीही नसते. त्यामुळे फोन पाण्यात पडला तर बहुतांश जण त्याची आशाच सोडून देतात. याबाबत तैवानच्या (Taiwan) एका पर्यटकाला आलेला अनुभव मात्र विलक्षण असून, त्याचा वर्षभरापूर्वी तलावात पडलेला आयफोन (iphone) त्याला सापडला असून, हा फोन चक्क व्यवस्थित चालू आहे. या लकी व्यक्तीचं नाव आहे चेन (Chen). चेन याच्याकडे आयफोन 11 प्रो मॅक्स (iphone 11 pro max) हा स्मार्टफोन होता. गेल्या वर्षी 15 मार्च रोजी तो सनमून तलावाजवळ (Sun Moon lake) पर्यटनाला गेलेला असताना बोटिंग करताना गळ्यातील पाउचमध्ये ठेवलेला त्याचा फोन पाण्यात पडला. त्या वेळी फोन शोधण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा तो सापडला नाही. त्या वेळी चेनच्या मित्राने गंमतीत सांगितलं की, पुढच्या वर्षी तुझा फोन मिळेल. आणि त्या मित्राचे शब्द खरे ठरले.

(वाचा - लाखोंमध्ये एखादीच होते अशी गडबड;2 लाख रुपयांत विकला गेला अनोख्या डिझाईनचा iPhone)

तब्बल वर्षभरानंतर 2 एप्रिल रोजी चेन यानं या तळ्यात जाऊन फोनचा शोध घेतला. यंदा तैवानमध्ये गेल्या 50 वर्षात पडला नव्हता इतका दुष्काळ पडला आहे. त्यामुळे या तलावातील पाणी आटलं (Receded Water levels) आहे. याचा फायदा चेनला मिळाला. त्याने गेल्या वर्षी फोन पडला होता त्याच्या आजूबाजूला शोध घेतला आणि त्याची शोधमोहीम यशस्वी ठरली आणि त्याचा फोन त्या तलावात सापडला. आश्चर्य म्हणजे हा फोन चक्क व्यवस्थित (fully Working) सुरू होता. त्याचं वॉटरप्रुफ कव्हर खराब झालं असलं, तरी फोन एकदा चार्ज करून बूट केला असता त्याची सगळी फंक्शन्स एकदम व्यवस्थित सुरू झाली. जणू काही झालंच नसल्यासारखा हा फोन अगदी उत्तमरित्या काम करतो आहे.

(वाचा - फ्रीमध्ये मिळतोय OnePlus Nord LE; संपूर्ण जगात फक्त एकाकडेच असणार हा स्मार्टफोन)

आपला फोन परत मिळाला आणि तो व्यवस्थित सुरू असल्याचा चेनला प्रचंड आनंद झाला असून, मी अतिशय भाग्यवान आहे, असं त्याने फेसबुकवर ही माहिती देताना म्हटलं आहे. या फोनचे आधीचे आणि सापडल्यानंतरचे फोटोही त्यानं शेअर केले आहेत. या भाग्यवान, अॅपल आयफोन ग्राहकावर लोकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून, अॅपलच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. अॅपल आयफोन म्हणजे सर्वोत्तम अशी ख्याती असून, लाखो रुपये किंमत असूनही आयफोन्सना जबरदस्त मागणी असते.
First published: