नवी दिल्ली, 12 एप्रिल: स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅपल (Apple) संपूर्ण जगभरात आपल्या आयफोनसाठी (iPhone) प्रसिद्ध आहे. अॅपल फोन आपल्या लुक्स, डिझाईन, फीचर्स आणि इनबिल्ट क्वालिटीसाठी ओळखला जातो. कंपनीकडून सुरुवातीपासून आतापर्यंत आयफोन कॅमेरा प्लेसमेंट, वॉल्यूम बटन, स्पीकर ग्रिल आणि अॅपल लोगोमध्ये कधीही बदल करण्यात आला नाही. परंतु नुकतंच एक असं प्रकरण समोर आलं, ज्यात अॅपल आयफोनचा लोगो मधोमध न लागता, तो काहीसा बाजूला लावला गेला. अॅपल आयफोन 11 प्रो या स्मार्टफोनचा (iPhone 11 Pro) लोगो (logo) बनवताना तांत्रिक गडबडीमुळे Logo अगदी मधोमध न लागता, काहीसा बाजूला प्रिंट झाला.
अशाप्रकारची गडबड सामान्य बाब नाही. रिपोर्टनुसार, अशा प्रकारची गडबड लाखोंमध्ये एखाद्याच वेळी होते. या अनोख्या आयफोनची 2 लाखांहून जास्तमध्ये विक्री करण्यात आली. हेच कारण होतं की हा फोन सर्वसाधारण किंमतीपेक्षा अधिकमध्ये विकला गेला.
इंटरनल आर्काइव, जो अॅपल प्रोटोटाईपसंबंधी माहिती शेअर करतो, त्याने एका ट्विटर पोस्टमध्ये सांगितलं की, या फोनच्या LOGO मधील तांत्रिक गडबडीमुळे हा फोन 2700 डॉलर जवळपास 2.01 लाख रुपयांत विक्री झाला.
ट्रिपल रियर कॅमेरा -
अॅपल आयफोन 11 प्रो स्मार्टफोमध्ये A13 बायोनिक चिपसेट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. तसंच या फोनला फ्रंटलाही 12 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
तसंच फोनला 5.80 इंची डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 3046mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात या iPhone 11 Pro ची किंमत 74,999 रुपयांपासून सुरू होते.
लवकरच येणार iPhone 13 सीरीज -
या वर्षाच्या अखेरपर्यंत आयफोन 13 चे चार मॉडेल लाँच केले जाण्याची शक्यता आहे. तसंच त्याआधी जूनमध्ये WWDC कॉन्फरन्सही ठेवण्यात आली आहे, ज्यात iOS 15 लाँच होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, Iphone, Money, Tech news, Technology