• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • इथे पोस्ट करा वॅक्सिनेशनचा फोटो आणि जिंका 5 हजार रुपये; वाचा भारत सरकारची ही खास ऑफर

इथे पोस्ट करा वॅक्सिनेशनचा फोटो आणि जिंका 5 हजार रुपये; वाचा भारत सरकारची ही खास ऑफर

My Gov द्वारा वॅक्सिनेशनला प्रोत्साहन देण्यासाठी एक कँपेन चालवण्यात येत आहे. या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा लस घेतल्यानंतर फोटो शेअर केल्यास, तो 5000 रुपये जिंकू शकतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 एप्रिल: कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी भारतात 1 मार्च 2021 पासून वॅक्सिनेशन ड्राईव्ह (vaccination drive) सुरू करण्यात आलं. अनेक जण वॅक्सिनेशननंतर आपला फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर करत आहेत, परंतु आता भारत सरकारने (Govt of India) वॅक्सिनेशननंतरचे फोटो शेअर करण्यासाठी 5000 रुपयांपर्यंतचं बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. दर महिन्याला 10 लोकांना असं बक्षिस मिळणार आहे. My Gov द्वारा वॅक्सिनेशनला प्रोत्साहन देण्यासाठी एक कँपेन चालवण्यात येत आहे. या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा लस घेतल्यानंतर फोटो शेअर केल्यास, तो 5000 रुपये जिंकू शकतो. असे जिंकता येतील पाच हजार - भारत सरकारद्वारा सुरू करण्यात आलेल्या वॅक्सिनेशनचा फोटो शेअर करुन पाच हजार रुपये मिळवण्यासाठी My Gov साईटवर जावं लागेल. https://auth.mygov.in/user/login?destination=oauth2/authorize यावर क्लिक करा. सर्वात आधी स्वत:ला रजिस्टर्ड करावं लागेल आणि त्यानंतर वॅक्सिनेशन करतानाचा फोटो येथे अपलोड करावा लागेल. येथे क्लिक करा. दर महिन्याला 10 लोक जिंकू शकतात 5 हजार रुपये - My Gov वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, वॅक्सिनेशनसाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत दर महिन्याला 10 लोक पाच हजार जिंकू शकतात. एक व्यक्ती या मोहिमेअंतर्गत एकच फोटो अपलोड करू शकतो. यासाठी तो आपले नातेवाईक, मित्र यांना वॅक्सिनेशनसाठी प्रोत्साहित करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, पाच हजार रुपये जिंकण्यासाठी केवळ वॅक्सिनेशनचा फोटो अपलोड करुन चालणार नाही. फोटोसह चांगली टॅगलाईन किंवा कॅप्शन देणं गरजेचं आहे, ज्यात वॅक्सिनेशनच्या महत्त्वाबाबत इतरांना प्रेरित करेल तसंच कोरोना लस घेण्यासाठीही प्रोत्साहित करेल. फोटोसह चांगलं कॅप्शन लिहिणं पाच हजार रुपये मिळवण्यास मदत करेल. लस घेण्यासाठी असं करा अप्लाय - वॅक्सिनेशनसाठी http://cowin.gov.in वेबसाईटवर अॅडव्हान्स अपॉईंटमेंट घेऊ शकता आणि ऑन-साईट रजिस्ट्रेशनही करू शकता. त्याशिवाय COWIN पोर्टल किंवा आरोग्य सेतू अॅपवरही रजिस्ट्रेशन किंवा अपॉईंटमेंट बुक करू शकता.
  Published by:Karishma
  First published: