मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Smartphone मधून डिलीट केल्यानंतर स्टोर राहतात Photo, असा होऊ शकतो चुकीचा वापर

Smartphone मधून डिलीट केल्यानंतर स्टोर राहतात Photo, असा होऊ शकतो चुकीचा वापर

आपल्या स्मार्टफोनमध्ये नको असलेले अनेक फोटो, व्हिडीओ, मेल्स डिलीट केले जातात. पण ते पूर्णपणे डिलीट होत नाहीत.

आपल्या स्मार्टफोनमध्ये नको असलेले अनेक फोटो, व्हिडीओ, मेल्स डिलीट केले जातात. पण ते पूर्णपणे डिलीट होत नाहीत.

आपल्या स्मार्टफोनमध्ये नको असलेले अनेक फोटो, व्हिडीओ, मेल्स डिलीट केले जातात. पण ते पूर्णपणे डिलीट होत नाहीत.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 6 मार्च : सध्या चुकूनच एखादा असा व्यक्ती असेल जो स्मार्टफोनचा (Smartphone) वापर करत नसेल. स्मार्टफोन, इंटरनेटच्या वापराने अनेक गोष्टी सोप्या-सहज झाल्या आहेत. याचा वापर जसा सोयीसा ठरतो तसा तो सोबत काही समस्याही घेऊन येतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये नको असलेले अनेक फोटो, व्हिडीओ, मेल्स डिलीट केले जातात. पण ते पूर्णपणे डिलीट होत नाहीत. स्मार्टफोनद्वारे अनेक कामं केली जातात. त्यामुळे फोनमध्ये अनेक फाइल्स, मेल सेव्ह होत राहतात. अनेकदा फोनमध्ये प्रायव्हेट फोटोही असतात. हे फोटो मेल रुपातही सेव्ह असतात. हे फोटो फोनमध्ये नको असल्यास डिलीट (Delete) बटणाद्वारे ते फोनमधून डिलीट केले जातात. पण स्मार्टफोनमधून डिलीट केलेल्या फाइल्स पूर्णपणे हटवल्या जात नाहीत. या फाइल्स, मेल, फोटो कुठे ना कुठे स्टोर होत राहतात. Smartphone मधून फोटो डिलीट झाले असं वाटतं, पण ते पूर्णपणे डिलीट होत नाहीत.

हे वाचा - तुम्ही वापरत असलेल्या 'थम्स अप' इमोजीचा खरा अर्थ माहितीये का? जाणून व्हाल थक्क

अँटी व्हायरस सॉफ्टवेयर कंपनी अवास्तने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी कंपनीने शॉपिंग वेबसाइट ईबेवरुन 20 सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी केले. त्यानंतर मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या एका सॉफ्टवेयरचा वापर करुन असे सर्व फोटो रीट्रीव्ह केले गेले जे फोनमधून डिलीट करण्यात आले होते. यात फोनमधील डिलीट केलेले फोटो पुन्हा समोर आले. या स्मार्टफोनमधून एकूण 40 हजार फोटो मिळाले असल्याचं कंपनीच्या डेटामधून समोर आलं. या फोटोमध्ये जवळपास एक हजार अश्लील फोटोही होते.

हे वाचा - चुकूनही मोडू नका WhatsApp चे हे नियम, बंद होऊ शकतं तुमचं Account

याचाच अर्थ स्मार्टफोनमधून फाइल्स, फोटो डिलीट केल्यानंतरही ते फोनमधून पूर्णपणे हटवले जात नाही. त्यामुळे कधीही फोन सेकंड हँड विकताना किंवा दुसऱ्याला वापरायला देताना किंवा फोन एक्सचेंज करुन त्याबदल्यात दुसरा घेताना तो फॅक्ट्री रीसेट करणं अत्यावश्यक ठरतं.
First published:

Tags: Photo, Smartphone, Tech news

पुढील बातम्या