नवी दिल्ली, 4 मार्च : पॉप्युलर इन्स्टंट मेसेजिंग App व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी नवे अपडेट देत असतं. परंतु WhatsApp वर एखाद्या युजरने काही नियम मोडले तर अकाउंट बंद होऊ शकतं. त्यामुळे WhatsApp वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं. WhatsApp चा वापर करताना मेसेज किंवा कॉलद्वारे एखाद्याचा अपमान केला, त्रास दिला तर व्हॉट्सअॅप ते अकाउंट (WhatsApp Account) बंद करू शकतं. याबाबतची तक्रार युजर स्वत:ही WhatsApp कडे करू शकतो. तसंच आपल्या ऑटोमेटेड सिस्टमद्वारे व्हॉट्सअॅप देखील एखाद्याच्या वाईट वर्तनाबाबत आणि अपमानाबाबत माहिती मिळवू शकतो. WhatsApp अनेक प्रायव्हसी फीचर्ससह येतं. एखाद्या युजरने एखादा धोकादायक व्हायरस किंवा धोकादायक कोड असणाऱ्या फाइल्स सर्क्यूलेट केल्याचं आढळल्यास कारवाई होऊ शकते. अशा फॉर्वर्डमुळे नियमांनुसार युजरचं अकाउंट बंद केलं जाऊ शकतं. WhatsApp आपल्या युजरचा डेटा सुरक्षित ठेवण्याकडे अधिक लक्ष देतं. जर कोणी चुकीच्या पद्धतीने युजरचा डेटा किंवा माहिती मिळवण्याचा-शेअर करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा परिस्थितीतही WhatsApp तुमचं अकाउंट बंद करू शकतो.
हे वाचा - Fraud Website कशा ओळखाल? Online कामांवेळी या गोष्टी लक्षात ठेवाच
व्हॉट्सअॅपवर अनेकदा व्हायरल, चुकीच्या किंवा फेक बातम्या कोणताही विचार न करता फॉर्वर्ड केल्या जातात. त्यामुळे खोट्या आणि चुकीच्या बातम्या पोहोचवणं व्हॉट्सअॅपच्या टर्म्स ऑफ यूजविरोधात आहे. अशा बातम्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या विरोधात व्हॉट्सअॅप तुमचं अकाउंट बॅन करू शकतो. WhatsApp आपल्या सर्व युजर्सचे फोन नंबर वेरिफाय करतो. त्यामुळे एखाद्या युजरने सतत, अनेक वेळा नंबर बदलल्याने वेरिफिकेशन प्रोसेसमध्ये समस्या येऊ शकते. अशा युजरचं हॅकिंगच्या संशयाच्या आधारे WhatsApp अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं.
हे वाचा - WhatsApp ची मोठी कारवाई, जानेवारीमध्ये 18.58 लाख भारतीय अकाउंट बॅन; कारणाचाही केला खुलासा
दरम्यान, जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) मोठी कारवाई केली आहे. कंपनीने जानेवारी 2022 दरम्यान 18.58 लाख भारतीयांचे व्हॉट्सअॅप अकाउंट्स (WhatsApp Account Banned) बॅन केले आहेत. कंपनीने नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी तक्रार विभाग आणि त्यांच्या सिस्टमद्वारे युजर्सकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.