मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुम्ही दररोज वापरत असलेल्या 'थम्स अप' इमोजीचा खरा अर्थ माहितीये का? जाणून व्हाल थक्क

तुम्ही दररोज वापरत असलेल्या 'थम्स अप' इमोजीचा खरा अर्थ माहितीये का? जाणून व्हाल थक्क

एका महिलेने 'थम्स अप' (Thumbs Up) या इमोजीचा खरा अर्थ (Real Emoji Meanings) टिकटॉकवर  (TikTok) सांगितला तेव्हा अनेकांना आपण हा इमोजी कुणाला आणि कशासाठी पाठवला हे आठवून स्वतःची लाज वाटली.

एका महिलेने 'थम्स अप' (Thumbs Up) या इमोजीचा खरा अर्थ (Real Emoji Meanings) टिकटॉकवर (TikTok) सांगितला तेव्हा अनेकांना आपण हा इमोजी कुणाला आणि कशासाठी पाठवला हे आठवून स्वतःची लाज वाटली.

एका महिलेने 'थम्स अप' (Thumbs Up) या इमोजीचा खरा अर्थ (Real Emoji Meanings) टिकटॉकवर (TikTok) सांगितला तेव्हा अनेकांना आपण हा इमोजी कुणाला आणि कशासाठी पाठवला हे आठवून स्वतःची लाज वाटली.

नवी दिल्ली 04 मार्च : आजकाल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या (Electronic Gadgets) माध्यमातून आपण एकमेकांशी बोलताना सर्रास इमोजीचा (Emoji) वापर करतो. शब्द मर्यादा (Word Limit) किंवा वेळ कमी असणं, हे त्यामागचं कारण अनेकदा सांगितलं जातं. त्यामुळेच संवाद साधण्यासाठी इमोटिकॉन (Popular Emoticons) किंवा इमोजी खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. पण बहुतेकांना या इमोजीचा खरा अर्थ काय आहे, हे माहिती नसतं.

सर्वात लोकप्रिय इमोजींपैकी एक म्हणजे 'थम्स अप' (Thumbs Up) इमोजी, म्हणजे तोच इमोटिकॉन जो बऱ्याचदा एकमेकांना अ‍ॅप्रूव्हल देण्यासाठी, कधी कधी काम व्यवस्थित पूर्ण झाल्याचं सांगण्यासाठी पाठवला जातो. पण जेव्हा एका महिलेने या इमोजीचा खरा अर्थ (Real Emoji Meanings) टिकटॉक (TikTok) वर सांगितला तेव्हा अनेकांना आपण हा इमोजी कुणाला आणि कशासाठी पाठवला हे आठवून स्वतःची लाज वाटली.

चुकूनही मोडू नका WhatsApp चे हे नियम, बंद होऊ शकतं तुमचं Account

'थम्स अप' इमोजीचा नेमका अर्थ काय?

@genwhyscarlett नावाच्या टिकटॉक अकाऊंटवरून एक मिनिटाचा व्हिडिओ बनवून, स्कार्लेट नावाच्या महिलेने नुकतेच स्पष्ट केले आहे की, इमोजी पाठवण्याच्या आपल्या सवयीबाबत थोडा विचार करण्याची गरज आहे. याचे कारण म्हणजे अनेकदा आपण एखाद्या इमोजीचा अर्थ जो समजतो, प्रत्यक्षात त्याचा तो अर्थ नसतो. उदाहरण म्हणून स्कारलेटने 'थम्स अप' ( Thumbs Up) हा इमोजी घेतला व ती म्हणाली, हा इमोजी बऱ्याचदा एखाद्याला प्रोत्साहन देण्यासाठी, अ‍ॅप्रूव्हल देण्यासाठी एकमेकांना पाठवला जातो. पण याचा खरा अर्थ अपमान असा आहे. त्यामुळे तुम्हाला 'थम्स अप' हा इमोजी मिळाला तर ही लाजिरवाणी, अपमान करणारी बाब आहे.

इमोटिकॉन्सचे काय आहेत अर्थ ?

टिकटॉक स्टार स्कार्लेट पुढे म्हणाली, 'डोळ्यात अश्रू असलेले इमोजी म्हणजे निरागसता, तर जीभ बाहेर काढून डोळे मिचकावणारे इमोजी म्हणजे मूर्ख. उलट्या चेहऱ्याच्या इमोजीचा अर्थ म्हणजे आयुष्याला घाबरणं, तर दोन डोळे म्हणजे आपण ऐकत आहोत. माइंड ब्लोइंग इमोजी म्हणजे खुशामत करणं.' 30 वर्षांच्या स्कार्लेटचा व्हिडिओ आतापर्यंत 9 लाख लोकांनी पाहिला आहे.

Instagram चा मोठा निर्णय, बंद होणार हे पॉप्युलर फीचर

इमोजी हे आजच्या डिजिटल युगामध्ये संवादाचा अविभाज्य भाग झाले आहेत. इमोजी टाळून सोशल मीडियावर संवाद करणं ही गोष्ट आता जवळपास अशक्य झाली आहे. कारण इमोजी वापरण्याची खूप सवय यूजर्सना झाली आहे. मात्र आपल्यापैकी अनेकजण सोशल मीडियावर संवाद साधताना इमोजी चुकीच्या अर्थाने वापरतात. या इमोजीचा नेमका अर्थ काय आहे, हे जर समजून घेतलं तर ही समस्या दूर होण्यास मदत होईल.

First published:

Tags: Whatsapp chat, Whatsapp messages