• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कोणता स्मार्टफोन वापरतात? पुतिन आणि किम जोंग यांच्या मोबाइलबद्दलही अनोखी माहिती

PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कोणता स्मार्टफोन वापरतात? पुतिन आणि किम जोंग यांच्या मोबाइलबद्दलही अनोखी माहिती

आपल्या देशातील पंतप्रधान कोणत्या कंपनीचा स्मार्टफोन वापरतात, याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. अनेकदा आपल्याला जेव्हा पंतप्रधान एखाद्या कार्यक्रमात बोलत असताना आपल्याला त्यांच्याकडे असलेला स्मार्टफोन दिसतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : आपल्या देशातील पंतप्रधान कोणत्या कंपनीचा स्मार्टफोन वापरतात, याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. अनेकदा आपल्याला जेव्हा पंतप्रधान एखाद्या कार्यक्रमात बोलत असताना आपल्याला त्यांच्याकडे असलेला स्मार्टफोन दिसतो. परंतु सहसा ते सार्वजनिकरित्या कोणता फोन वापरतात हे जाहिर करत नाही. परंतु मागच्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अनेकवेळा अमेरिकी टेक कंपनी Apple चा फोन वापताना बघितलं गेलं आहे. जेव्हा ते 2018 साली चीनच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांना Apple चा फोन वापरतावा पाहण्यात आलं होतं. परंतु कुठलाही राष्ट्रप्रमुख सहसा स्मार्टफोनचा वापर करत नाही. त्यामागे काही सुरक्षा कारणं असतात. त्यांच्याकडे एखादा स्मार्टफोन असला तरी त्यात काही विशेष अॅप्स आणि सॉफ्टवेअर असतात. ज्यामुळं त्यांच्या स्मार्टफोनला सुरक्षित केलं जातं. सावधान! QR Code द्वारे होणारी ऑनलाईन फसवणूक वाढली; असा करा स्वतःचा बचाव अनेकवेळा देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसोबतचा संवाद हा त्यांच्या सेक्रेटरींमार्फत केला जातो. कारण त्यांच्याकडे एनक्रिप्टेड मोबाईल असतो. जो भारतातील नवरत्न पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने बनवला आहे. या मोबाईल फोनला हॅक करणं शक्य नाही, तसेच या स्मार्टफोन्सवर भारतीय सुरक्षा यंत्रणांची नजर असते. त्याचबरोबर भारताचे गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्याकडे जून 2019 मध्ये Apple कंपनीचा एक्स एस मॉडल हा स्मार्टफोन होता. त्यामाध्यमातून ते लोकांशी कनेक्ट होत होते. परंतु आता ते कोणता फोन वापरतात, याबद्दल काही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. इतकंच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ब्लॅकबेरी फोन वापरताना पाहण्यात आलं होतं. Income Tax Rules : काय आहे इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड? जाणून घ्या प्रक्रिया त्याचबरोबर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल या नोकिया 6260 आणि ब्लॅकबेरी J10 हे स्मार्टफोन वापरतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे iPhone वापरायचे तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे कुठलाही वैयक्तिक स्मार्टफोन वापरत नाही. त्यामुळं त्यांचा इतर देशातील राष्ट्रप्रमुखांशी संपर्क हा त्यांच्या सेक्रेटरींमार्फत केला जातो. त्याचबरोबर उत्तर कोरियाचा राष्ट्रप्रमुख किम जोंग उन (Kim Jong Un) याच्याकडे HTC कंपनीचा स्मार्टफोन आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: