मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! QR Code द्वारे होणारी ऑनलाईन फसवणूक वाढली; असा करा स्वतःचा बचाव

सावधान! QR Code द्वारे होणारी ऑनलाईन फसवणूक वाढली; असा करा स्वतःचा बचाव

आपल्या देशात सध्या डिजीटल पेमेंट्सचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. छोटा उद्योग करणाऱ्या लघू उद्योजकापासून तर नोकरदारापर्यंत सध्या सर्वच लोकांना ऑनलाइन पेमेंट करणं सहज आणि सोपं वाटत आहे.

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : आपल्या देशात सध्या डिजीटल पेमेंट्सचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. छोटा उद्योग करणाऱ्या लघू उद्योजकापासून तर नोकरदारापर्यंत सध्या सर्वच लोकांना ऑनलाइन पेमेंट करणं सहज आणि सोपं वाटत आहे. परंतु या डिजिटल पेमेंट्सचा वापर करताना अनेकदा लोकांची फसवणूक होते. त्यातून लाखो रूपयांचा गंडा घातला गेल्याचे अनेक गुन्हे घडलेले आहेत. त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी ते आपण जाणून घेऊयात. अनेकदा आपल्याला सुटे पैसे किंवा आपल्याकडे कॅश नसेल तर आपल्याला ऑनलाइन पेमेंट करणं भाग पडतं. परंतु अशाच वेळी आपली फसवणूक होण्याचीही शक्यता असते. डिजिटल ट्रांजेक्शन (Digital transaction) च्या बाबतीत आता भारत सर्वात पुढे आहे. पेमेंट सिस्टम कंपनी ACI world-wide नुसार भारतात 2025 पर्यंत 71 टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. कोरोनाकाळात तर या व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. अगदी काही क्षुल्लक रकमेचेही व्यवहार ऑनलाइन पद्धतीने लोकांनी केले होते. Passport काढण्यासाठी सरकारी Umang App करेल मदत, असं करा अप्लाय आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय करायला हवं? आपल्याला अनेकदा आपल्या मोबाईलवर अनोळखी लिंक्स येतात. त्याची आपल्याला काहीही माहिती नसते. अशावेळी त्या लिंक्सवर क्लिक करू नका. कारण त्याद्वारे आपल्या खात्यावरून पैसे काढले जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अनेकदा आपल्याला मेसेज किंना ई-मेलवर लॉटरी लागल्याचा संदेश येतो, अशा वेळी त्यावर विश्वास ठेवू नका, कारण ते आपल्यासाठी आर्थिक फसवणूकीचं कारण ठरण्याची शक्यता असते. तुमचा कंप्यूटर स्लो झालाय? या सोप्या पद्धतीने असा होईल सुपरफास्ट अनेकदा काही वेबसाइट्स या फेक असतात. त्यावळी ग्राहकांना आर्थिक लाभाची जाहिरात दाखवली जाते. त्यातून देखील लोकांना ऑनलाइन गंडा घातला जातो. त्यामुळं अशा कोणत्याही फेक वेबसाइट्सपासून सावध रहा. आपल्याला आपल्या बँकेशी संबंधिकत कुठलंही काम असेल तर स्वत: बँकेत जायला हवं. कुणी अनोळखी व्यक्ती आपल्याल बँकेतून बोलत असल्याचं सांगून आपल्या बँकेची डिटेल्स मागितली तर त्याला देऊ नका. कारण त्यातून तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Financial fraud, Google, Money fraud, Online fraud

    पुढील बातम्या