• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Income Tax Rules : काय आहे इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड? जाणून घ्या ITR व्हेरिफिकेशन प्रक्रिया

Income Tax Rules : काय आहे इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड? जाणून घ्या ITR व्हेरिफिकेशन प्रक्रिया

2015 मध्ये, आयकर विभागाने इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) ही सुविधा आणली आहे. हा 10 अंकांचा अल्फान्यूमरिक कोड आहे

  • Share this:
नवी दिल्ली 22 ऑक्टोबर : आयकर विभागाने गेल्या वर्षी सुरू केलेल्या फेसलेस असेसमेंट स्कीम (Faceless Assessment Scheme) अंतर्गत जमा करण्यात येणाऱ्या ई-रेकॉर्डचे प्रमाणिकरण नियम (Authentication Rules of e-Records) अर्थ मंत्रालयाने (The Finance Ministry) आणखी सोपे केले आहेत. आता आयकर विभागाच्या पोर्टलवर करदात्यांच्या नोंदणीकृत खात्यातून जमा केलेल्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला करदात्यांकडून इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) ने प्रमाणित केले असल्याचे मानले जाईल. इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड म्हणजे काय? 2015 मध्ये, आयकर विभागाने इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) ही सुविधा आणली आहे. हा 10 अंकांचा अल्फान्यूमरिक कोड आहे. करदात्याने त्याचे आयकर रिटर्न (Income Tax Return) भरल्यानंतर हा कोड जनरेट होतो. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया ई-व्हेरिफिकेशन केल्यानंतरच पूर्ण होते. अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं व्हेरिफिकेशनसाठी 120 दिवसांची मुदत तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नचे (ITR) ऑनलाइन तसेच ऑफलाइन व्हेरिफिकेशन करू शकता. एकदा तुमचे आयटीआर ई-फाइलिंग वेबसाइटवर अपलोड झाल्यावर, आयटी विभाग तुम्हाला तुमच्या आयटीआरचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी 120 दिवसांचा कालावधी देतो. दिलेल्या मुदतीमध्ये व्हेरिफिकेशनचे काम पूर्ण केले नाही तर आयटी कायद्यांनुसार तुमचा कर भरणा अवैध होईल. असं करा आयटीआरचे व्हेरिफिकेशन - ई-व्हेरिफिकेशन प्रक्रिया करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टल वरील 'ई-व्हेरिफाय रिटर्न' या लिंकवर क्लिक करा. - यानंतर पॅन, असेसमेंट वर्ष इत्यादी आवश्यक माहिती भरा. - आता 'ई-व्हेरिफाय’ वर क्लिक करा. - यानंतर तुमचा ई-व्हेरिफिकेशन कोड (EVC) जनरेट होईल. PNB ग्राहकांना या स्कीममधून मिळेल 15 लाखांचा फायदा, वाचा काय आहे योजना? ई-व्हेरिफिकेशनसाठी वापरू शकता चार पर्याय 1. बँक खाते 2. नेट-बँकिंग 3. आधार कार्ड 4. डिमॅट खाते दरम्यान, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 होती. मात्र, केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यातच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख वाढवली आहे. आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) जमा करता येईल. या वर्षात सरकारने दोन वेळा इन्कम टॅक्स फाइल करण्याची मुदत वाढवली आहे. पहिल्यांदा कोरोनामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र दुसऱ्यांदा तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच सीबीडीटीनं कंपन्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2021 वरून पुढे ढकलत 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. अधिक माहितीसाठी https://www.incometax.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
First published: