मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Twitter : ट्विटर करतोय उजव्या विचारांच्या ट्विटर हॅडल्सला प्रमोट; संशोधनातून माहिती आली समोर

Twitter : ट्विटर करतोय उजव्या विचारांच्या ट्विटर हॅडल्सला प्रमोट; संशोधनातून माहिती आली समोर

ट्विटर जगभरातील उजव्या विचारांच्या लोकांच्या ट्विटर हॅडल्सला अधिक रिच (Twitter Algorithm) देत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळं आता ट्विटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर :  जगभरात सध्या ट्विटरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढत असून त्यावर विविध अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, सिनेसृष्टीतले सेलिब्रिटी आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. मागच्या काही काळापासून लोक फेसबुकपेक्षा ट्विटरचा वापर जास्त प्रमाणात करू लागल्याने ट्विटर या अॅपची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. परंतु आता ट्विटर जगभरातील उजव्या विचारांच्या लोकांच्या ट्विटर हॅडल्सला अधिक रिच (Twitter Algorithm) देत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळं आता ट्विटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे.

हे संशोधन करणाऱ्या टीमचं म्हणणं आहे की ट्विटरचा Algorithm हा विशिष्ट पद्धतीने सेट करण्यात आला असून ज्यात उजव्या विचारांच्या लोकांच्या ट्विट्सला प्राधान्य दिलं जात आहे. त्याचबरोबर हे प्रकरण फक्त एखाद्या देशापुरतं मर्यादित नसून ते जगभरात घडत असल्याचीही माहिती संशोधनकर्त्यांनी दिली आहे.

Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स

त्यात उजव्या विचारांचे लोक आणि उजव्या विचारांच्या पक्षांच्या ट्विटला ट्विटरने सेट केलेल्या Algorithm मुळं अधिक (Right wing Twitter handles getting rich on Twitter) लोकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे. त्याचबरोबर उजव्या विचारांच्या ट्विटर हँडल्सच्या तुलनेत डाव्या किंवा इतर विचारांच्या ट्विटर हँडल्सना तेवढा रिच मिळत नाही, अशीही माहिती या संशोधनातून समोर आली आहे.

iPhone Hacked : चीनी हॅकर्सने फक्त 15 सेकंदात हॅक केला Apple iPhone 13 Pro

रिसर्च करणाऱ्या या कंपनीनं जगातील सात देशांमध्ये याबाबत सर्वेक्षण केलं असून त्यात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. त्यात 1 एप्रिल 2020 पासून तर 15 ऑगस्ट पर्यंतच्या ट्विटरवरील ट्विट्सचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात ट्विटर सातत्यानं उजव्या विचारांच्या लोकांच्या ट्वीट्सला प्रमोट करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Revolt ची ही इलेक्ट्रीक बाईक लॉन्च; 5 तासांच्या चार्जिंगवर चालणार 150KM

ट्विटरच्या मेटा टीमचे निर्देशक रुम्मन चौधरी यांनी याविषयी बोलताना म्हटलं आहे की आम्हाला माहिती मिळाली आहे की डाव्या विचारांच्या ट्विटर हँडल्सपेक्षा उजव्या विचारांच्या हँडल्सला अधिक रिच मिळत आहे. पंरतु ट्विटर एक तंत्रज्ञान प्रणाली असल्याने कदाचित त्याच्या Algorithm सिस्टममुळं हे प्रकार घडत असतील. त्यामुळं आता आम्ही त्यावर काम करत आहोत.

PUBG : पबजी लवर्ससाठी Good News! भारतात या तारखेपासून PUBG New State होणार रिलीज

काही दिवसांपूर्वी ट्विटर कंपनी आणि भारत सरकारमधील फेक न्यूजवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर आता ट्विटरवर पुन्हा हे आरोप लागत असल्यानं ट्विटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्वचिन्हं उपस्थित केलं जात आहे.

First published:

Tags: Social media trends, Twitter, Twitter War