मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

PUBG : पबजी लवर्ससाठी Good News! भारतात 'या' तारखेपासून PUBG New State होणार रिलीज

PUBG : पबजी लवर्ससाठी Good News! भारतात 'या' तारखेपासून PUBG New State होणार रिलीज

तरूणाईला वेड लावणाऱ्या आणि मानसिक तणावात ढकलणाऱ्या पबजी गेमवर मागच्या वर्षी भारत सरकारने बंदी आणली होती. परंतु आता भारतात पुन्हा पबजी गेम सुरू होण्याची चिन्हं आहेत.

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : तरूणाईला वेड लावणाऱ्या आणि मानसिक तणावात ढकलणाऱ्या पबजी गेमवर मागच्या वर्षी भारत सरकारने बंदी (pubg ban in india) आणली होती. परंतु आता भारतात पुन्हा पबजी गेम सुरू होण्याची चिन्हं आहेत. कारण दक्षिण कोरियाई कंपनी क्राफ्टॉनने भारतसहित 200 पेक्षा जास्त देशांमध्ये अॅड्रॉयड और iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर नव्या स्वरूपातील पबजी (Pubg New State to be released on November 11 in India) म्हणजेच पबजी न्यू स्टेट लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 29 आणि 30 ऑक्टोबरला 28 देशांमध्ये याची फायनल टेस्टिंग केली जाणार आहे. त्यामुळं येत्या 11 नोव्हेंबरला हा गेम भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या कंपनीने न्यू स्टेट हा पबजी गेम तयार करण्याती घोषणा फेब्रुवारीत केली होती. त्यामुळं पबजी गेमची आवड असणाऱ्या पाच कोटी लोकांनी कंपनीकडे आपलं रजिस्ट्रेशन केलं होतं. या गेमच्या निर्मितीच्या घोषणेनंतर त्याच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. भारतात याचं सप्टेंरमध्ये लाइव्ह रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं. Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स यासंदर्भात माहिती देताना क्राफ्टॉन कंपनीच्या सूत्रांनी यूट्यूबवर लाइवस्ट्रीमच्या एका इव्हेंटमध्ये याविषयी बोलताना सांगितलं आहे की हा गेम जागतिक पातळीवर 17 वेगवेगळ्या भाषांमध्ये असणार आहे. त्याचबरोबर हा गेम मोबाईलवर संपूर्णरित्या फ्री असणार आहे. त्यात नव्या टेक्नॉलॉजीसह 1 गनप्ले सिस्टमही असणार आहे. PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कोणता स्मार्टफोन वापरतात? पुतिन आणि किम जोंग? परंतु आता या गेमची तुलना ही PC वर्जन पबजी बॅटलग्राउंडसोबत केली जात आहे. या गेमला आधीच्या पबजी गेमसारखंच बॅटल रॉयल गेम व्हर्जन हे पबजी स्टूडिओकडूनच विकसित केलं जाणार आहे. त्यामुळं आता मागच्या वर्षी भारत सरकारने पबजीवर बंदी घातल्याने नाराज झालेल्या पबजी प्रेमींना या गेममुळं पबजी खेळता येणार आहे. कारगाड्यांच्या ऑनलाइन बुकिंगचा ट्रेंड वाढला आता मागच्या वेळी भारत आणि चीनचे बिघडलेले संबंध आणि भारतीय तरूणाईला पबजी गेममुळं लागलेलं वेड पाहता सरकारने पबजीवर बंदी घातली होती, आता सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Pubg game, Technology

    पुढील बातम्या