मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Revolt ची ही इलेक्ट्रीक बाईक लॉन्च; 5 तासांच्या चार्जिंगवर चालणार 150KM, इतकी आहे किंमत!

Revolt ची ही इलेक्ट्रीक बाईक लॉन्च; 5 तासांच्या चार्जिंगवर चालणार 150KM, इतकी आहे किंमत!

सध्या देशात इलेक्ट्रॉनिक बाईकची मोठी क्रेझ पाहायला मिळत असून आता रिवोल्ट कंपनीनेही नवीन RV400 नावाची इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. त्याची प्री बुकिंग आजपासून भारतात सुरू करण्यात आली आहे.

  • Published by:  Atik Shaikh
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : सध्या देशात इलेक्ट्रॉनिक बाईकची मोठी क्रेझ पाहायला मिळत असून आता रिवोल्ट (Revolt RV400) कंपनीनेही नवीन RV400 नावाची इलेक्ट्रिक (Electric Bike) बाईक लॉन्च केली आहे. त्याची प्री बुकिंग आजपासून भारतात सुरू करण्यात आली असून त्याची किंमत ही 1.7 लाख रूपये एवढी ठेवण्यात आली आहे. त्यामुळं जर तुम्ही कमी किंमतीत इलेक्ट्रॉनिक बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बाईक कमी किंमतीत आणि चांगल्या सुविधा असल्याने आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. ही बाईक केवळ पाच तासांच्या चार्जिंगवर 150 किलोनमीटर चालत असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ही बाईक फायदेशीर ठरेल. भारतातल्या 70 शहरांमधून करू शकाल बुकिंग रिवोल्ट कंपनीने या इलेक्ट्रॉनिक बाईकला ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी भारतातल्या 70 शहरांमध्ये बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या भारतातील प्रमुख महानगरांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक बाईक 5 तासात चार्ज होते आणि एकाच चार्जमध्ये किमान 80 किमीची स्पीड देते. PUBG : पबजी लवर्ससाठी Good News! भारतात या तारखेपासून PUBG New State होणार रिलीज या इलेक्ट्रिक बाईकची टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे. यात अतिशय अनोखी आणि सुलभ चार्जिंग प्रणाली आहे. यात छोटी चार्जरही देण्यात आला आहे, ज्याला आपण इतर ठिकाणी सहजरित्या नेऊ शकतो. Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स त्याचबरोबर चार्ज करण्यासाठी त्याला कोणत्याही पॉवर सॉकेटशी जोडले जाऊ शकते. त्यामुळं या बाईकची चार्जिंग ही घरात किंवा ऑफिसमध्येही करता येणार आहे.  
First published:

Tags: Bike riding, Electric vehicles, Electricity

पुढील बातम्या