नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : आयफोन (iPhone) कंपनीचा स्मार्टफोन हा सुरक्षेसाठी सर्वोत्तम मानला जातो. परंतु चीनमधील (Chine) तियानफू या मोबाईल हॅकिंगच्या स्पर्धेत काही चीनी (Chinese hackers hack iPhone 13 Pro) हॅकर्सनी चक्क iPhone 13 Pro हॅक करून दाखवला आहे. त्यामुळं आता आयफोनच्या सुरक्षेसंबंधी गंभीर प्रश्न उभे राहिले आहे. कारण वापरकर्त्यांच्या खाजगी माहितीविषयीची गोपनीयता पाळण्याबाबत आयफोनला सर्वात सुरक्षित मानलं जातं. परंतु आता चीनच्या हॅकर्सनी हा मोबाईल हॅक करून दाखवल्याने इलेक्ट्रानिक्स मोबाईल कंपनी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
चीनी सरकारद्वारे दरवर्षी चेंगदू शहरात मोबाईल हॅकिंगची स्पर्धा भरवण्यात येते. त्यात चीनमधील काही नामचीन हॅकर्सदेखील या स्पर्धेत भाग घेतात. त्यातच आता मध्यंतरी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कुनलुन लॅब टीमने स्मार्टफोन iPhone 13 Pro या स्मार्टफोनला (iPhone Hacked) केवळ 15 सेकंदात हॅक केलं आहे.
Realme कंपनीच्या या हँडसेटवर बंपर डिस्काऊंट; फोनची किंमत अवघे...
या हॅकर्सनी या फोनमध्ये iOS 15.0.2 असतानासुद्धा iPhone 13 Pro ला एकदा नाही तर दोनदा हॅक करून दाखवलं आहे. यावेळी या मोबाईलला हॅक करणाऱ्या हॅकरने याविषयी बोलताना सांगितलं की आम्ही iPhone 13 Pro हॅक करण्याची तयारी फार दिवसांपासून करत होतो.
PM मोदी आणि गृहमंत्री अमित शाह कोणता स्मार्टफोन वापरतात? पुतिन आणि किम जोंग?
आता हा फोन हॅक फक्त कुनलुन लॅब टीमनेट हॅक केला नाही तर टीम पंगु ने ही आयफोन आयपॅड हॅक केलेले आहेत. या हॅकिंगच्या स्पर्धेत या टीमने iPhone 13 Pro ला हॅक करून 3 लाख डॉलर म्हणजेच 2,25,16,905 रूपयांच्या बक्षिसावर दावा केला आहे. Apple कंपनी आपल्या स्मार्टफोन्सच्या सुरक्षेवर कायम लक्ष देत असते.
Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स
या कंपनीच्या स्मार्टफोन्सला हॅक करणं सहज सोपी गोष्ट नाही. त्यामुळं आता iPhone 13 Pro हा स्मार्टफोन हॅक करणाऱ्या वेगवेगळ्या टीम या त्यांनी कशा पद्धतीने हे मोबाईल हॅक केले त्यासंदर्भातली माहिती Apple कंपनीला देणार आहे. त्यानंर कंपनीकडून त्यात सुधारणा करण्यात येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.