जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स

Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स

Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स

रिलायंन्सकडून काही आठवड्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती की हा फोन दिवाळीपूर्वी लॉन्च करण्यात येईल. परंतु आता रिलायंन्सने काही मोजक्या यूजर्ससह या फोनची ट्रायल सुरू केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : जिओ फोनच्या अभूतपूर्व यशानंतर आता रिलायन्स कंपनीने JioPhone Next मोबाईल आणण्याची तयारी (Reliance will soon launch JioPhone Next) सुरू केली आहे. रिलायंन्सकडून काही आठवड्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती की हा फोन दिवाळीपूर्वी लॉन्च करण्यात येईल. परंतु आता रिलायंन्सने काही मोजक्या यूजर्ससह या फोनची ट्रायल सुरू केली आहे. त्यामुळं आता हा फोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. कारण या फोनचा गूगलच्या console list मध्येही समावेश (JioPhone Next console list in Google Play) करण्यात आला आहे. त्यामुळं आता काही दिवसांनी ही फोन बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फोनच्या लिस्टींगला सर्वात पहिल्यांदा अभिषेक यादव यांच्याद्वारे पाहण्यात आलं होतं. सावधान! QR Code द्वारे होणारी ऑनलाईन फसवणूक वाढली; असा करा स्वतःचा बचाव जिओ फोनमध्ये नेक्स्ट 320 डीपीआय स्क्रीन डेंसिटी सपोर्ट हा एचडी+ 720 x 1440 डिस्प्ले आहे. या फोनमध्ये डिव्हाइस क्वाड कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 (क्यूएम 215) प्रोसेसर असणार आहे. त्याचबरोबर त्यात एड्रेनो 306 जीपीयू आणि 2 जीबी रॅमचा सपोर्ट असणार आहे.जिओ फोन नेक्स्ट हा जगातील सर्वात स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन ठरणार आहे. Income Tax Rules : काय आहे इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड? जाणून घ्या प्रक्रिया त्यात एकच कॅमेरा सेट-अप असेल, ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा सेन्सर दिले जाण्याची शक्यता आहे. डिव्हाइसमध्ये फ्रंट कॅमेरा देखील असणार आहे, जो व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी वापरला जाऊ शकतो. या वर्षी जूनमध्ये जिओच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत(एजीएम)जिओ फोन नेक्स्टची घोषणा करण्यात आली होती. हा फोन सप्टेंबरमध्ये रिलीज होणार होता. परंतु काही कारणास्तव कंपनीने डिव्हाइस लॉन्च करण्याची तारीख पुढे ढकलली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात