• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! आता Jio देत आहे काही सेकंदात Data Loan

रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! आता Jio देत आहे काही सेकंदात Data Loan

जियोनं एक बंपर (jio emergency data loan) ऑफर सुरू केली आहे. त्याद्वारे आता युजर्सला काही सेकंदात 1GB चा डाटा लोन मिळत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : सध्याच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासेसमुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यासाठी युजर्सला मोठा डाटा पॅक असलेला रिचार्ज करावा लागत आहे. परंतु तरीही काम करत असताना अनेकदा युजर्सच्या (Recharge Now, Pay later) स्मार्टफोनमधील डाटा लवकर संपत आहे. त्यासाठी आता जियोनं एक बंपर (jio emergency data loan) ऑफर सुरू केली आहे. त्याद्वारे आता युजर्सला काही सेकंदात 1GB चा डाटा लोन मिळत आहे. त्यामुळं रिचार्ज न करताही जियो युजर्सला इंटरनेट पॅक मिळणार आहे. जियोचा हा प्लॅन नेमका काय आहे पाहुयात.

  Facebook चं हे फीचर वाचवेल तुमचा वेळ, वाचा कशाप्रकारे कराल वापर?

  काय आहे ऑफर? Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच युजर्सला Emergency Data Loan देण्याची ऑफर सुरू केली होती. Recharge Now, Pay later असं नाव असलेली ही ऑफर आता चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सला My Jio App वर जाऊन Apply करावं लागत आहे. या ऑफरच्या माध्यमातून युजर्सला 5 वेळा Emergency Data Loan मिळू शकतं.

  iOS नंतर आता अँड्रॉइड युजर्ससाठी खूशखबर! Twitter वर मिळेल पैसे कमावण्याची संधी

  एकावेळी 1GB डाटा (jio data loan 2021) मिळेल, त्याची प्राईज ही 11 रूपये ठेवण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर युजर्सला याचे पैसे नंतरही देता येतील. त्यामुळे आता दररोज काही जीबींमध्ये डाटाची गरज असलेल्या जियो युजर्ससाठी ही ऑफर फायदेशीर ठरत आहे.

  Smartphoneमधील Photos आणि Videos चुकून झाले डिलीट; या स्टेप्स वापरून करा रिकव्हर

  असं करा अप्लाय... या ऑफरचा लाभ घेण्यासाठी जियो युजर्सला सर्वात आधी My Jio App वर जावं लागेल. त्यानंतर Emergency Data Loan चा पर्याय दिसेल. जर होम पेजवर हा ऑप्शन दिसत नसेल तर त्यासाठी Service ऑप्शनमध्ये जाऊन चेक करायला हवं.

  आता Google Pay वर आवाजाद्वारेही करता येईल Transaction; हे आहे भन्नाट फीचर्स

  Get Emergency Data या पर्यायावर क्लिक केल्यानंतर 1GB डाटाच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर त्याला सेलेक्ट करून Activate करा. त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 1GB देण्यात येईल.
  Published by:Atik Shaikh
  First published: