• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आता GPay वर फक्त बोलून करता येईल Transaction; पाहा काय आहे फीचर्स

आता GPay वर फक्त बोलून करता येईल Transaction; पाहा काय आहे फीचर्स

भारतात ऑनलाईन पेमेंट्समध्ये आघाडीवर असलेल्या Google Pay ने आता युजर्ससाठी एक धमाकेदार नवं फीचर आणलं आहे. त्याद्वारे आता युजर्सना तोंडी सूचनेवरून (Google Pay Launch New Feature Launch) ऑनलाईन Transaction करता येणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : भारतात ऑनलाईन पेमेंट्समध्ये आघाडीवर असलेल्या Google Pay ने आता युजर्ससाठी एक धमाकेदार फीचर आणलं आहे. त्याद्वारे आता युजर्सला फक्त बोलूनदेखील (Google Pay Launch New Feature Launch) ऑनलाईन Transaction करता येणार आहे. त्याचबरोबर या वर्षी गूगल पे मध्ये 4 नवीन फीचर्स जोडले जाणार आहे. यासंदर्भात एका इव्हेंटमध्ये Google Pay कडून याबाबत (make payments verbally on Google Pay) घोषणा करण्यात आली आहे. तर हे कोणकोणते फीचर्स असतील हे जाणून घेऊयात. Hinglish Language- गूगल पे ने या फीचर्सला भारतातील 3.5 कोटी युजर्सला डोळ्यासमोर ठेऊन आणलं आहे. कारण त्यांची भाषा ही Hinglish म्हणजे हिंदी आणि इंग्लिश अशी मिक्स आहे. हे फीचर पुढच्या वर्षी येणार असं बोललं जात आहे. त्यामुळं या फीचर्सद्वारे युजर्सला ज्यांना पैसे पाठवायचे आहे त्यांची डिटेल्स भरावी लागणार आहे. 2024 मध्ये चार्जर नसलेले स्मार्टफोन येणार बाजारात? पाहा काय आहे योजना... My Shop- या फीटर्सच्या माध्यमातून गूगल पे ने अधिकाधिक छोट्या व्यवसायिक आणि दुकानदारांना डोळ्यासमोर ठेवलं आहे. या फीचर्सच्या माध्यमातून (Transaction on Google Pay) ग्राहकांला कोणतंही सामान घेण्यासाठी थेट दुकानदाराला ऑर्डर देता येईल. केलेल्या ऑर्डरचा ट्रॅकिंग रेकॉर्डदेखील गूगल पे वर राहणार आहे. PAN Card वर फोटो आणि Signature करता येणार चेंज; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस Speech to Text- या फीचर्समुळं गूगल पे वर पेमेंट करणं आणखी सोपं होणार आहे. कारण सध्या पेमेंट करण्यासाठी युजर्सला अकाउंट नंबर, UPI ID किंवा इतर माहिती टाईप करावी लागत होती. परंतु आता या फीचर्समुळं युजर्सला भाषा निवडून त्यात फक्त बोलावं लागणार आहे. त्यामुळं पेमेंट करणं आणखी सोपं होणार आहे. धक्कादायक! फेसबुकद्वारे पाकिस्तानी हॅकर्स लोकांना करतायंत टार्गेट? Bill Split- या फीचर्सच्या माध्यमातून युजर्सला एकापेक्षा अधिक लोकांना पैसे पाठवता येईल. म्हणजे या फीचर्सला ग्रुप फीचर्ससारखं पाहिलं जात आहे. त्यामुळं युजर्सला एकच अमाउंट टाईप करून त्यातील रक्कम ही वेगवेगळ्या लोकांना पाठवता येणार आहे. त्यासाठी आधी ज्यांना पैसे पाठवायचे आहे अशा युजर्सला सेलेक्ट करावं लागणार आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर सेलेक्ट केलेली रक्कम ही वेगवेगळ्या युजर्सच्या खात्यात जाईल.
  Published by:Atik Shaikh
  First published: