मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook चं हे फीचर वाचवेल तुमचा वेळ, वाचा कशाप्रकारे कराल वापर?

Facebook चं हे फीचर वाचवेल तुमचा वेळ, वाचा कशाप्रकारे कराल वापर?

अनेकदा असं होतं की फेसबुक पोस्ट आणि या प्लॅटफॉर्म वरील व्हिडीओ बघण्यात युजर्सचा खूप वेळ निघून जातो. तुमच्याही बाबतीत असंच घडतं का? तर फेसबुक अॅपमध्ये असे एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फेसबुकचा वेळ सहज व्यवस्थापित करू शकाल

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: फेसबुकचा वापर करणाऱ्यांची (Facebook Users) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी या प्लॅटफॉर्मवरील काही नवीन फीचर्स देखील युजर्सच्या उपयोगी ठरतात. या फीचर्समुळे फेसबुक अॅपही खूप सुरक्षित बनत आहे. दरम्यान काही वेळा असं होतं की फेसबुक पोस्ट आणि या प्लॅटफॉर्म वरील व्हिडीओ बघण्यात युजर्सचा खूप वेळ निघून जातो. तुमच्याही बाबतीत असंच घडतं का? तर फेसबुक अॅपमध्ये असे एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फेसबुकचा वेळ सहज व्यवस्थापित करू शकाल. या फीचरचे नाव आहे- Facebook Quiet Mode फीचर. जाणून घ्या हे फीचर कसे वापरता येईल?

काय आहे फेसबुकचे Quiet Mode फीचर?

गेल्या वर्षी, फेसबुकने अॅपमध्ये एक नवीन फीचर जोडले होते, क्वाइट मोड म्हणून ओळखले जाते. या फीचरची खासियत म्हणजे याद्वारे युजर्स त्यांचा वेळ सहज मॅनेज करू शकतात. या फीचरचा वापर करून युजर्स फेसबुकच्या सर्व नोटिफिकेशन्स एकाच वेळी म्यूट करू शकतात. जेव्हा हे फीचर एनेबल केले जाते त्यावेळी फेसबुकवर जे पुश नोटिफिकेशन येतात ते म्यूट होतात. युजर्स हवं तर वेळ शेड्यूल देखील करू शकतात की त्यांना कधीपर्यंत Facebook Quiet Mode फीचर सुरू ठेवायचे आहे.

हे वाचा-Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का?

कशाप्रकारे कराल या फीचरचा वापर?

>> फेसबुक app ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला हॅमबर्गचे आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा

>> आता स्क्रोल डाऊन करून खाली देण्यात आलेल्या सेटिंग अँड प्रायव्हसीच्या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर सेंटिंगवर क्लिक करा

>> याठिकाणी तुम्हाला Preferences चा सेक्शन दिसेल.  याठिकाणी योअर टाइम ऑन फेसबुक लिहिण्यात आलेले दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.

>> नंतर See Time वर क्लिक करा, याठिकाणी तुम्ही माहित करून घेऊ शकता की किती वेळ तुम्ही फेसबुकवर घालवला आहे.

>> Manage your Time या पर्यायावर क्लिक करा, ज्याठिकाणी तुम्हाला क्वाइट मोड दिसेल. हा मोड ऑन करा. तुम्हाला वाटल्यास तुम्ही शेड्यूल क्वाइट मोडवर जाऊन तुमचा टाइम देखील शेड्यूल करू शकता.

हे वाचा-Smartphoneमधील Photos आणि Videos चुकून झाले डिलीट; या स्टेप्स वापरून करा रिकव्हर

Reminder करा सेट

तुम्ही Quiet Mode फीचरच्या खाली डेली टाइम रिमाइंडरचा पर्याय पाहू शकता, जेव्हा तुम्ही Facebook चालू केल्यानंतर किती वेळ वापरायचे याची वेळ तुम्ही सेट करू शकता. म्हणजेच, जर तुम्ही अर्धा तास निवडलात, तर अर्ध्या तासानंतर तुम्हाला फेसबुक रिमाइंडर मिळेल.

First published:

Tags: Facebook