• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • iOS नंतर आता अँड्रॉइड युजर्ससाठी खूशखबर! Twitter वर मिळेल पैसे कमावण्याची संधी

iOS नंतर आता अँड्रॉइड युजर्ससाठी खूशखबर! Twitter वर मिळेल पैसे कमावण्याची संधी

अँड्रॉइड वापरणाऱ्या ट्विटर युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने अखेर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी 'टिप्स' फीचर (Twitter Tips) सुरू केले आहे. सुरुवातीला हे फीचर केवळ iOS वर मर्यादित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: अँड्रॉइड वापरणाऱ्या ट्विटर युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने अखेर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी 'टिप्स' फीचर (Twitter Tips) सुरू केले आहे. सुरुवातीला हे फीचर केवळ iOS वर मर्यादित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते, ट्विटर टिप्स आता सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे आणि याद्वारे तुम्ही क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात पेमेंट देखील स्वीकारू शकता. ट्विटर प्रोफाइल पेजवर फॉलो बटणाजवळ 'टिप्स' आयकॉन दिसेल. ट्विटर युजर्स त्यांचे पेमेंट प्रोफाइल लिंक करण्यासाठी टिप्स फीचरचा वापर करू शकतात. यासाठी सपोर्टेड प्लॅटफॉर्ममध्ये  Bandcamp, CashApp, Chipper, Patreon, Rogerpay, Wealthsimple Cash आणि Venmo यांचा समावेश आहे. तुम्ही कमावलेल्या टिप्समधून Twitter कोणतेही कमिशन घेणार नाही. हे वाचा-Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का? युजर्स स्ट्राइक वापरून बिटकॉइनमधूनही टिप देऊ शकतात. स्ट्राइक जागतिक स्तरावर त्वरित आणि विनामूल्य पेमेंट ऑफर करते. हे एल साल्वाडोर आणि यू.एस. मध्ये (हवाई आणि न्यूयॉर्क वगळता) उपलब्ध आहे. एखाद्याच्या स्ट्राइक खात्यावर टिप्स पाठवण्यासाठी कोणत्याही बिटकॉइन लाइटनिंग वॉलेटचा वापर केला जाऊ शकतो. कसे एनेबल कराल Twitter Tips? 1. तुमच्या Twitter प्रोफाइलवर जा. 2.‘Edit profile’ वर क्लिक करा. हे वाचा-SBI Fraud Alert: बँक खात्यासंदर्भातली 'ही' माहिती कुणालाही सांगू नका; अन्यथा... 3. टिप्सपर्यंत स्क्रोल करा आणि त्यावर टॅप करा. ते सुरू करण्यासाठी ‘General Tipping Policy’ स्वीकारा. 4. टिप्स चालू करण्यास अनुमती द्या आणि नंतर तुम्ही वापरू इच्छित असलेल्या थर्ड पार्टी सेवेची निवड करा. 5. तुमचे थर्ड पार्टी सर्व्हिस युजरनेम जोडा. तुमच्या Twitter प्रोफाइलवर टिप्सचे चिन्ह दिसण्यासाठी तुम्ही किमान एक युजरनेम प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: