नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर Big Billion Days सेल सुरू आहे. 3 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सेल 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरू आहे. आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये अनेक स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुमचं बजेट 10 हजार रुपये असल्यास या किंमतीत काही चांगल्या फीचर्ससह असलेल्या फोनचा विचार करू शकता.
Realme C21Y -
Flipkart सेलमध्ये Realme C21Y फोनचं 4Gb वेरिएंट 8,999 रुपयांत मिळतं. फोनला 5000mAh बॅटरी, 6.5 इंची HD+ डिस्प्ले, Unisoc T610 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी 13MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसंच 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
SAMSUNG Galaxy F12 -
सॅमसंगच्या या फोनची किंमत 9,499 रुपये आहे. 4 GB + 64 GB वेरिएंटमध्ये 6.5 इंची HD+ डिस्प्ले, 6000 mAh बॅटरी, Exynos 850 प्रोसेसर, 48MP + 5MP + 2MP + 2MP क्वाड रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
POCO C31 -
फोनच्या 3 GB वेरिएंटची किंमत 7,999 रुपये आणि 4 GB वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. यात 6.53 इंची HD+ डिस्प्ले, 13MP + 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Infinix Hot 11 -
4 GB वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. 5200mAh बॅटरी, 6.6 इंची Full HD+ डिस्प्ले, 13MP + Depth Lens डुअल रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि MediaTek Helio G70 प्रोसेसर आहे.
OPPO A33 -
3 GB + 32 GB वेरिएंटची किंमत 8,990 रुपये आहे. यात 6.5 इंची HD+ डिस्प्ले, 13MP + 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, Qualcomm Snapdragon 460 प्रोसेसर आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Oppo smartphone, Realme, Samsung galaxy, Smartphone, Tech news