मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

केवळ 101 रुपयांत खरेदी करू शकता Vivo चे हे प्रीमियम स्मार्टफोन, पाहा काय आहे जबरदस्त ऑफर

केवळ 101 रुपयांत खरेदी करू शकता Vivo चे हे प्रीमियम स्मार्टफोन, पाहा काय आहे जबरदस्त ऑफर

कंपनीच्या या फेस्टिव्ह ऑफरचा फायदा ग्राहक 15 ऑक्टोबरपर्यंत घेऊ शकतात. ऑफर अंतर्गत ग्राहकांना सेलमध्ये 5000 रुपयांचा कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI आणि जिओ बेनिफिट्स मिळणार आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : फेस्टिव्ह सीजन पाहता चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo आपल्या काही स्मार्टफोन्सवर स्पेशल ऑफर देत आहेत. कंपनीने आपले वीवो X70 सीरीज (Vivo X70 Series), वीवो V21 सीरीज (Vivo V21) आणि वीवो Y73 (Vivo Y73) सारखे फोन स्वस्तात उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या फेस्टिव्ह ऑफरचा फायदा ग्राहक 15 ऑक्टोबरपर्यंत घेऊ शकतात. ऑफर अंतर्गत ग्राहकांना सेलमध्ये 5000 रुपयांचा कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI आणि जिओ बेनिफिट्स मिळणार आहेत.

Vivo X70 Series, Vivo V21, Vivo Y73 वर ऑफरचा फायदा ग्राहक रिटेलर, वीवो इंडिया E-Store आणि मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे घेऊ शकतात. ऑफरदरम्यान ग्राहक CICI बँक, Citi बँक आणि Kotak महिंद्रा बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करत असतील, तर त्यांना Vivo X70 Series वर 10 टक्के कॅशबॅक मिळेल.

त्याशिवाय Bajaj Finance अंतर्गत Vivo फोन केवळ 101 रुपयांत मिळतील. तसंच HDB Financial Services अंतर्गत ग्राहकांना Vivo X60, V आणि Y Series वर 2500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. दुसरीकडे IDFC बँक ग्राहकांना Vivo Y72 आणि Vivo Y73 खरेदीवर 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

50MP गिंबल कॅमेरासह Vivo X70 Pro+, X70 Pro भारतात लाँच, काय आहे किंमत

फोटो: Vivo.

Jio अंतर्गत 10000 रुपयांचा बेनिफिट -

Vivo Y73 वर जिओ बेनिफिट्समध्ये 10000 रुपये दिले जात आहे. तसंच, Vivo Y सीरीजवर 7000 रुपये जिओ बेनिफिट्स मिळू शकतात.

Vivo X70, X70 Pro फीचर्स -

Vivo X70 आणि X70 Pro या मॉडेल्समध्ये 6.56 इंची AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मीडियाटेक डायमेंशन 1200 प्रोसेसर देण्यात आला आहे. 8GB+128GB आणि 12GB+256GB अशा दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये फोन उपलब्ध आहे. हे फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo X70 फोनला 40 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेलची एक लेन्स आणि 13 मेगापिक्सेलची एक लेन्स देण्यात आली आहे.

First published:

Tags: Smartphone, Vivo