मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमचा Smartphone ओव्हरहीट होतो? मोठ्या दुर्घटनेपासून वाचण्यासाठी लगेच करा हे काम

तुमचा Smartphone ओव्हरहीट होतो? मोठ्या दुर्घटनेपासून वाचण्यासाठी लगेच करा हे काम

फोनमध्ये सतत ओव्हरहीटची समस्या असल्यास स्मार्टफोन ब्लास्ट होण्यासारख्या दुर्घटना घडू शकतात. परंतु काही टीप्सद्वारे ओव्हरहिटींची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

फोनमध्ये सतत ओव्हरहीटची समस्या असल्यास स्मार्टफोन ब्लास्ट होण्यासारख्या दुर्घटना घडू शकतात. परंतु काही टीप्सद्वारे ओव्हरहिटींची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

फोनमध्ये सतत ओव्हरहीटची समस्या असल्यास स्मार्टफोन ब्लास्ट होण्यासारख्या दुर्घटना घडू शकतात. परंतु काही टीप्सद्वारे ओव्हरहिटींची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : स्मार्टफोन जवळपास सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे. फोनचा सतत वापर सुरू असल्याने ओव्हरहीटची समस्या येते. काही स्मार्टफोन तर अगदी कमी वापरानेही लगेचच गरम होतात. तुमच्या फोनसोबतही असं होत असल्यास, काळजी घेण्याची गरज आहे. फोनमध्ये सतत ओव्हरहीटची समस्या असल्यास स्मार्टफोन ब्लास्ट होण्यासारख्या दुर्घटना घडू शकतात. परंतु काही टीप्सद्वारे ओव्हरहिटींची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

चार्जिंगवेळी अशा चुका करू नका -

स्मार्टफोन कधीही 100 टक्के चार्ज करू नका. 90 टक्के चार्ज झाल्यानंतर फोन चार्जिंगवरुन काढा. त्यानंतर फोनची बॅटरी 20 टक्क्यांपर्यंत कमी झाल्यानंतर पुन्हा चार्जिंगला लावा. अनेक जण फोन रात्रभर फोन चार्जला लावतात, हे धोकादायक ठरू शकतं.

मोबाइल कव्हर -

स्मार्टफोन गरम होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, मोबाइल कव्हर देखील आहे. ऊन आणि गरम वातावरणाचा परिणाम मोबाइलवरही होतो. ज्याप्रमाणे एका बंद कारमध्ये हीट निर्माण होते, त्याप्रमाणे मोबाइल कव्हरमुळेही फोन कूलिंगमध्ये समस्या येऊ शकते. फोन कव्हर वेळोवेळी काही वेळासाठी हटवणं गरजेचं आहे.

Fake Mobile App मुळे तुमच्या बँक अकाउंटला धोका, असं तपासा App खरं की खोटं?

बॅकग्राउंड Apps -

फोनमध्ये अनेकदा बॅकग्राउंड Apps देखील ओव्हरहिटींगची समस्या ठरू शकतात. जर तुम्ही एखाद्या App चा वापर करत नसाल, तर ते बॅकग्राउंडमधून बंद करावेत. अनेक Apps बॅकग्राउंडमध्ये काम करत राहतात आणि फोन गरम होतो. ज्या App चा वापर करत नाही, ते बंद करण्यासाठी App Icon वर फोर्स स्टॉपची निवड करा.

फोन Setting बदला -

स्मार्टफोनचा ब्राइटनेस शक्यतो कमी ठेवा. इनडोर कंडिशनमध्ये हे योग्य ठरतं. ब्राइटनेस कमी असल्यास, बॅटरीवर लोडदेखील कमी पडतो, त्यामुळे डिव्हाईस कमी गरम होतो. फोनचा ब्राइटनेस ऑटो मोडवर ठेवा, जो इनडोर ब्राइटनेस कमी आणि आउटडोरमध्ये आपोआप अॅडजस्ट होतो.

Paytm असलेला फोन हरवला? असं ब्लॉक किंवा डिलीट करा तुमचं अकाउंट

ओरिजनल चार्जर आणि USB केबल -

आपल्या फोनसोबत मिळालेलं ओरिजनल चार्जर हरवलं किंवा तुटलं-खराब झालं, तर अशा स्थितीत अनेक जण लोकल चार्जर किंवा USB केबलचा वापर करतात. ही बाब नुकसानकारक ठरू शकते. स्मार्टफोनला डुप्लिकेट किंवा स्वस्त चार्जरने चार्ज केल्यास, स्मार्टफोन ओव्हरहीट होऊ शकतो. यामुळे केवळ स्लो चार्जिंगची समस्या येत नाही, तर यामुळे बॅटरी खराब होण्यासह फोनमध्ये ब्लास्टचाही धोका निर्माण होतो.

First published:

Tags: Smartphone, Tech news