मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

12000 रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोनवर मिळेल 6000 रुपये Cashback, Airtel ची भन्नाट स्किम

12000 रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोनवर मिळेल 6000 रुपये Cashback, Airtel ची भन्नाट स्किम

पहिला स्मार्टफोन प्रोग्रामअंतर्गत एयरटेलने (Bharti Airtel Ltd) शुक्रवारी 12000 च्या फोनवर 6000 रुपये कॅशबॅक मिळवण्याची घोषणा केली.

पहिला स्मार्टफोन प्रोग्रामअंतर्गत एयरटेलने (Bharti Airtel Ltd) शुक्रवारी 12000 च्या फोनवर 6000 रुपये कॅशबॅक मिळवण्याची घोषणा केली.

पहिला स्मार्टफोन प्रोग्रामअंतर्गत एयरटेलने (Bharti Airtel Ltd) शुक्रवारी 12000 च्या फोनवर 6000 रुपये कॅशबॅक मिळवण्याची घोषणा केली.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : भारतातील टेलिकॉम कंपनी Airtel ने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. पहिला स्मार्टफोन प्रोग्रामअंतर्गत एयरटेलने (Bharti Airtel Ltd) शुक्रवारी 12000 च्या फोनवर 6000 रुपये कॅशबॅक मिळवण्याची घोषणा केली. या स्किमअंतर्गत ग्राह मोबाइल अपग्रेडही करू शकतात. यासाठी तब्बल 150 स्मार्टफोन लिस्ट करण्यात आले आहेत. कसा मिळेल कॅशबॅक - 6000 रुपये कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना सर्वात आधी एक स्मार्टफोन खरेदी करावा लागेल, ज्याची किंमत 12000 रुपये असावी. त्यानंतर ग्राहकाला दर महिन्याला Airtel चा 249 रुपये किंवा त्यावरील प्रीपेड प्लॅन घ्यावा लागेल. हे एकदा नाही, तर केवळ 36 महिने करावं लागेल. ग्राहकाने 36 महिन्यांपर्यंत 249 किंवा त्यावरील रिचार्ज केल्यास, त्याला Airtel कडून दोन भागांमध्ये 6000 रुपये कॅशबॅक दिला जाईल. 6000 कॅशबॅकचा पहिला 18 महिन्यांनंतर मिळेल. म्हणजे 18 महिने रिचार्ज केल्यानंतर ग्राहकाला पहिली लिस्ट जारी केली जाईल, जी 2000 रुपयांची असेल. त्यानंतर बाकी 4000 रुपये ग्राहकाला 36 महिने पूर्ण झाल्यानंतर दिले जातील. म्हणजे सलग 36 महिने रिचार्ज केल्यानंतर शेवटी संपूर्ण 6000 रुपये कॅशबॅक मिळेल. या स्किमअंतर्गत 150 स्मार्टफोन सामिल आहेत. कोणताही ग्राहक 6000 रुपयांचा फोनही घेऊ शकतो. 3 वर्षानंतर त्याला आपल्या फोनची संपूर्ण किंमत कॅशबॅकमध्ये मिळेल. म्हणजे स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळेल. कंपनीने ही स्किम माझा पहिला स्मार्टफोन या प्रोग्रामअंतर्गत आणली आहे. कंपनी आपल्यासोबत अधिकाधिक ग्राहक जोडू इच्छिते. तसंच ग्राहक अधिक काळापर्यंत त्यांच्यासोबत राहावेत, हा या ऑफरचा हेतू आहे.

iPhone 13 आणि iPhone 13 Pro खरेदी करा नो कॉस्ट EMI वर

दरम्यान, एअरटेल दोन प्रीपेड रिचार्जसह टर्म लाइफ इन्शुरन्स देत आहे. यापैकी एक प्लॅन 279 रुपयांचा आहे तर दुसरा 179 रुपयांचा आहे. 279 रुपयांच्या प्लॅनमध्ये अन्य बेनिफिट्ससह 4 लाख रुपयांचा टर्म लाइफ इन्शुरन्स मिळेल. तर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाख रुपयांचा इन्शुरन्स आहे.
First published:

Tags: Airtel, Recharge

पुढील बातम्या