मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /50MP कॅमेरासह Realme 9i बजेट Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

50MP कॅमेरासह Realme 9i बजेट Smartphone लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

रियलमी 9 सीरिजमध्ये (Realme 9 Series) कंपनीने रियलमी 9i (Realme 9i) स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

रियलमी 9 सीरिजमध्ये (Realme 9 Series) कंपनीने रियलमी 9i (Realme 9i) स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

रियलमी 9 सीरिजमध्ये (Realme 9 Series) कंपनीने रियलमी 9i (Realme 9i) स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

नवी दिल्ली, 18 जानेवारी : रियलमी 9 सीरिजमध्ये (Realme 9 Series) कंपनीने रियलमी 9i (Realme 9i) स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा फोन भारताआधी व्हिएतनाममध्ये लाँच करण्यात आला होता. Realme 9i दोन स्टोरेज वेरिएंट 4GB RAM + 64GB ECf 6GB RAM + 128GB मध्ये लाँच झाला आहे. या बजेट स्मार्टफोनला Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. बजेट फोनमध्ये या प्रोसेसरसह असणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. फोनचा RAM 5GB पर्यंत वाढवताही येऊ शकतो.

हे वाचा - मॅट्रिमोनियल साइटवरील इंजिनिअर निघाला भामटा; पुण्यातील महिलेला 62 लाखांचा गंडा

काय आहेत फीचर्स -

-6.6 इंची LCD टच स्क्रिन डिस्प्ले

- HD रेजोलूशन स्क्रिनसह 90Hz रिफ्रेश रेट

- पंच-होल सेल्फी कॅमेरा

- बॅक पॅनलला तीन कॅमेरा आणि एक LED फ्लॅश

- Qualcomm लेटेस्ट Snapdragon 680 प्रोसेसर

- 5,000mAh बॅटरी

- 33W फास्ट चार्गिंग सपोर्ट

- कनेक्टिविटीसाठी USB Type C सपोर्ट

हे वाचा - Amazon Sale मध्ये 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणा हे 5 जबरदस्त Smartphone

कॅमेरा -

Realme 9i या बजेट फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनला दोन मोठे सेंसर आणि एक छोटा सेंसर LED फ्लॅशसह मिळेल. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तर फोनला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर मिळेल. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हे वाचा - Alert!बँकेतही सुरक्षित नाही तुमचा पैसा;सर्व्हेतून धक्कादायक खुलासा,काय आहे कारण

Realme 9i दोन कलर ऑप्शन प्रिज्म ब्लॅक आणि प्रिज्म ब्लूमध्ये आहे. या फोनचा सेल 22 जानेवारी रोजी 12 वाजता सुरू होणार आहे. तर 25 जानेवारीपासूव फ्लिपकार्ट (Flipkart), रियलमी साइट (Realme.com) आणि इतर रिटेल स्टोअर्समध्ये खरेदी करता येऊ शकतो.

Realme 9i च्या 4GB RAM + 64GB वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर याच्या टॉप 6GB RAM + 128GB वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.

First published:

Tags: Realme, Smartphone, Tech news