मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मॅट्रिमोनियल साइटवरील इंजिनिअर निघाला भामटा; पुण्यातील महिलेला घातला 62 लाखांचा गंडा; वाचा काय आहे प्रकरण

मॅट्रिमोनियल साइटवरील इंजिनिअर निघाला भामटा; पुण्यातील महिलेला घातला 62 लाखांचा गंडा; वाचा काय आहे प्रकरण

पुण्यात (Pune, Maharashtra) एका खासगी कंपनीच्या मॅनेजमेंट प्रोफेशनलसह तब्बल 62 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यात (Pune, Maharashtra) एका खासगी कंपनीच्या मॅनेजमेंट प्रोफेशनलसह तब्बल 62 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यात (Pune, Maharashtra) एका खासगी कंपनीच्या मॅनेजमेंट प्रोफेशनलसह तब्बल 62 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

पुणे, 17 जानेवारी : पुण्यात (Pune, Maharashtra) एका खासगी कंपनीच्या मॅनेजमेंट प्रोफेशनलसह तब्बल 62 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची पीडित महिलेशी मॅट्रिमोनियल साइटवर (Matrimonial Site) भेट झाली होती. महिलेला त्याने स्वत:ची ओळख बिटनमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत असल्याचं सांगितलं होतं.

द इंडियन एक्सप्रेसनुसार, पीडित महिलेने वाकड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिने डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मॅट्रिमोनियल साइटवर या व्यक्तीशी बोलण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांत त्यांचं फोनवर बोलणं सुरू झालं. यादरम्यान त्याने तो भारतात येत असल्याची योजना आखत असल्याचं सांगतिलं. तसंच भारतात आल्यानंतर इथेच स्थायिक होणार असल्याचंही त्याने महिलेला सांगितलं.

हे वाचा - UPI Payment करता?UPI PINद्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून करा बचाव, NPCI ने केलं अलर्ट

आरोपीने महिलेसमोर लग्नासाठीचा प्रस्तावही ठेवला. महिलेनेही लग्नासाठी होकार दिला. यादरम्यान त्यांचं बोलणं सुरुचं होतं. त्याने आधी आपलं सामान भारतात पाठवून नंतर स्वत:चं येथे येणार असल्याचं सांगितलं. भारतात सामान पाठवण्यासाठी या महिलेने आरोपीसाठी पैसे खर्च केले. या सामानात सर्व प्रकारच्या प्रोसेसिंग फीस, टॅक्स, फाइन अशा गोष्टी सामिल होत्या.

हे वाचा - WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

पीडित महिलेने सांगितलं, की तिने जवळपास 15 वेळा आरोपीच्या विविध बँक अकाउंटमध्ये जवळपास 62 लाख रुपये पाठवले. इतके पैसे त्या व्यक्तीला पाठवल्याच्या काही दिवसांनंतर आपल्यासोबत फ्रॉड होत असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर महिलेने पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क केला आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती इन्स्पेक्टर संतोष पाटील यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Money, Online fraud, Pune