मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! बँकेतही सुरक्षित नाही तुमचा पैसा, Deloitte च्या सर्व्हेतून धक्कादायक खुलासा, वाचा काय आहेत कारणं

Alert! बँकेतही सुरक्षित नाही तुमचा पैसा, Deloitte च्या सर्व्हेतून धक्कादायक खुलासा, वाचा काय आहेत कारणं

स्वत: बँकाच सुरक्षित नसल्याने तुमचा पैसाही सुरक्षित नसल्याचं एका सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. बँक आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशांवर दुसऱ्याच व्यक्तींची नजर आहे.

स्वत: बँकाच सुरक्षित नसल्याने तुमचा पैसाही सुरक्षित नसल्याचं एका सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. बँक आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशांवर दुसऱ्याच व्यक्तींची नजर आहे.

स्वत: बँकाच सुरक्षित नसल्याने तुमचा पैसाही सुरक्षित नसल्याचं एका सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. बँक आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशांवर दुसऱ्याच व्यक्तींची नजर आहे.

नवी दिल्ली, 18 जानेवारी : लोक आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी ती बँकेत जमा (Bank Deposits) करतात. बँकेत पैसे सुरक्षित असण्यासह ठेवलेल्या रकमेवर रिटर्न्सही मिळतात. परंतु एका रिपोर्टनुसार, बँकेत तुमचा पैसे सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत काही कारणंही देण्यात आली आहेत. स्वत: बँकाच सुरक्षित नसल्याने तुमचा पैसाही सुरक्षित नसल्याचं एका सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. बँक आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशांवर दुसऱ्याच व्यक्तींची नजर आहे.

कोरोना काळात डिजीटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. एकीकडे डिजीटल पेमेंट, व्यवहार वाढत असताना दुसरीकडे बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये सायबर क्राइमच्या (Cyber Fraud) प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली. मागील दोन वर्षात यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑडिट, कन्सल्टिंग, टॅक्स आणि अॅडव्हायजरी सर्विसेज फर्म डेलॉयट इंडियाने (Deloitte India) एका सर्व्हेमध्ये सांगितलं, की बँका आणि वित्तीय संस्था स्वत: या ऑनलाइन फ्रॉडपासून सुटका करुन घेण्यासाठी सामना करत आहेत. यापुढे भविष्यातही अशाप्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटना घडत राहतील असंही डेलॉयटने सांगितलं.

हे वाचा - तुम्हीही Google Chrome चा वापर करता? चुकूनही अपडेट करू नका हे ब्राउजर, बसेल फटका

सायबर क्राइमच्या घटनांमागे ही आहेत कारणं -

डेलॉयट टच तोहमात्सु इंडिया एलएलपीने (Deloitte Touche Tohmatsu India LLP) सांगितलं, की पुढील दोन वर्षात सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होण्याच्या कारणांचा शोध घेण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणात कामाच्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी काम करणं अर्थात रिमोटली वर्किंग, ग्राहकांद्वारे ऑफ- ब्रांच बँकिंग चलनाचा वाढता वापर आणि फॉरेन्सिक विश्लेषण साधनांची मर्यादित उपलब्धता सामिल आहे.

Deloitte चा हा सर्व्हे भारतातील विविध वित्तीय संस्थांच्या 70 सिनियर अधिकाऱ्यांच्या चर्चेवर आधारित आहे. हे अधिकारी जोखीम व्यवस्थापन, लेखापरीक्षण आणि मालमत्ता पुनर्प्राप्ती अर्थात वसुली यांसारखी कामं पाहतात. सर्व्हेमध्ये सामिल होणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये प्रायव्हेट, पब्लिक, विदेशी, सहकारी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकाचा समावेश आहे.

हे वाचा - Online Fraud टाळण्यासाठी या सोप्या गोष्टी लक्षात ठेवाच

सर्व्हेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महासाथ आणि नव्या डिजीटल ट्रेंडमुळे फसवणुकीच्या वाढत्या घटनांचा सामना करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्था संघर्ष करत आहेत. या सर्व्हेतील 78 टक्के लोकांनी पुढील दोन वर्षात फसवणुकीच्या प्रकरणांत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

First published:
top videos

    Tags: Online crime, Online fraud, Online payments, Personal banking, Tech news