मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Facebook, Instagram वर स्कॅम अ‍ॅड्सद्वारे युजर्सची फसवणूक, News Feed वर बनावट जाहिराती कशा ओळखाल?

Facebook, Instagram वर स्कॅम अ‍ॅड्सद्वारे युजर्सची फसवणूक, News Feed वर बनावट जाहिराती कशा ओळखाल?

जर तुम्हीही फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर जाहिराती पाहून शॉपिंग करत असाल, तर काही गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. काहीही समजायच्या आत या जाहिरातींमुळे फसवणूक होऊ शकते.

नवी दिल्ली, 15 जून: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवरुन (Instagram) अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यापैकी फसवणूक करणाऱ्या स्कॅमवाल्या जाहिराती अर्थात Ads आहेत. फ्रॉड करणारे ई-कॉमर्स वेबसाईटसारख्या दिसणाऱ्या वेबसाईट बनवून याची जाहिरात फेसबुकवर करतात. तसंच फेसबुक हे रोखू शकत नसल्याचं स्कॅमर्स अर्थात फसवणूक करण्यांना माहित आहे. या बनावट, स्कॅम अ‍ॅड्स पाहून त्यावर अनेक युजर्स शॉपिंग करत असून गेल्या काही महिन्यात अनेकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे.

जर तुम्हीही फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर जाहिराती पाहून शॉपिंग करत असाल, तर काही गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. काहीही समजायच्या आत या जाहिरातींमुळे फसवणूक होऊ शकते.

फेसबुकवर तुम्ही काय पाहता यावरुनच ट्रॅक करुन फेसबुक तुम्हाला जाहिराती दाखवतो. समजा, जर तुम्ही कपड्यांपासून, फळं, भाज्यांबाबत सर्च करत असाल, तर फेसबुक आणि इन्स्टावर अशाच जाहिराती दाखवल्या जातील. असली जाहिरातींसह इथे नकली वेबसाईट कंपन्यादेखील याचा फायदा घेतात.

(वाचा - तुमच्या कामाची बातमी;Appअसली आहे की नकली?डाउनलोड करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा)

अधिकतर जाहिराती मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून असतात. परंतु नेहमीच असं होतं असं नाही. काही वेळा युजर्स बनावट वेबसाईट खरी समजून त्यावरुन सामान ऑर्डर करतात. पेमेंट केल्यानंतर, केवळ वाट पाहत राहावं लागतं. फ्रॉड वेबसाईटवर जाऊन त्या नंबरवर कॉल केल्यास फोन लागत नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.

असे अनेक प्रकार समोर आले आहेत. कारण फेसबुक आणि इन्स्टावर दाखवल्या जाणाऱ्या सगळ्याच जाहिरातींना युजर्स खरं समजतात. खरी वेबसाईट समजून शॉपिंग करतात आणि पेमेंटही करतात.

(वाचा - Facebook वर तुमचंही Fake Account ओपन झालंय? असं करा डिलीट)

News Feed वर बनावट जाहिराती कशा ओळखाल?

सर्वात महत्त्वाची आणि कठीण बाब म्हणजे खोट्या जाहिरातीही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर खऱ्याप्रमाणेच दिसतात. परंतु याची ओळख करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

- कोणतीही फेसबुक पोस्ट तुम्हाला जाहिरातीसारखी दिसत असेल आणि तिथे Sponsored पोस्ट दिसत नसेल, तर तो स्कॅम असू शकतो.

- फेसबुक ज्या कोणत्याही अधिकृत जाहिराती अ‍ॅक्सेप्ट करतो, त्याबाबत व्हेरिफिकेशन केलं जातं, जेणेकरुन तो स्कॅम आहे की नाही ते समजू शकेल.

(वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च किंवा तुमच्या एक्सला स्टॉक केलं आहे का? Google ने आता उचललं मोठं पाऊल)

- फेसबुकवर तुम्ही तुमच्या ई-कॉमर्स कंपनीची जाहिरात दिली, तर तिथे Sponsored लिहिलेलं येईल. ज्या पोस्टवर Sponsored लिहिलेलं असेल, तो स्कॅम नसेल. येथेही फ्रॉडची शक्यता आहे, परंतु ती अतिशय कमी आहे.

- एका रिपोर्टनुसार, स्कॅम अ‍ॅड्सबाबत रिपोर्ट केल्यानंतरही फेसबुक त्यापैकी 26 टक्केच अ‍ॅड्स हटवतो. परंतु स्कॅम अ‍ॅड रिपोर्ट मिळाल्यानंतर लगेच त्याला बॅन केलं जातं, असा दावा फेसबुकने केला आहे.

First published:

Tags: Facebook, Tech news