मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तु्म्हीही पॉर्न सर्च किंवा तुमच्या एक्सला स्टॉक केलं आहे का? Google ने आता उचललं मोठं पाऊल

तु्म्हीही पॉर्न सर्च किंवा तुमच्या एक्सला स्टॉक केलं आहे का? Google ने आता उचललं मोठं पाऊल

Google ने त्यांच्या वार्षिक आयओ परिषदेत डेव्हल्पर्ससाठी 'Quick Delete' सर्च हिस्ट्री फीचरची घोषणा केली आहे.

Google ने त्यांच्या वार्षिक आयओ परिषदेत डेव्हल्पर्ससाठी 'Quick Delete' सर्च हिस्ट्री फीचरची घोषणा केली आहे.

Google ने त्यांच्या वार्षिक आयओ परिषदेत डेव्हल्पर्ससाठी 'Quick Delete' सर्च हिस्ट्री फीचरची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, 19 मे : इंटरनेट वापरकर्त्यांच्या (Internet Users) गोपनीयतेचं रक्षण करण्याच्या दृष्टीने गुगल (Google) आपल्या युजर्ससाठी मागच्या 15 मिनिटांत केलेल्या कोणत्याही सर्च हिस्ट्रीला हटवण्याची सुविधा आणत आहे. युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठं पाऊल समजलं जात आहे. युजर्सला आपल्या डेटावर अधिक नियंत्रण ठेवण्याची सुविधा देणारी गुगल दुसरी टेक कंपनी ठरली आहे. जानेवारी 2020 मध्ये फेसबुकने घोषणा केली होती, की युजर्सकडे आता एका क्लिकवर काम करणारं 'क्लियर हिस्ट्री' बटण असेल. Google ने त्यांच्या वार्षिक आयओ परिषदेत डेव्हल्पर्ससाठी 'Quick Delete' सर्च हिस्ट्री फीचरची घोषणा केली आहे. प्रायव्हसीसंबंधित फीचर्सच्या दिशेने वाटचाल करण्याचं एक कारण म्हणजे, गुगल आणि फेसबुकसारख्या (Facebook) टेक कंपन्यांना युजरच्या प्रायव्हसीबाबत अनेक चाचाण्यांना सामोरं जावं लागत आहे. तसंच युजर्स आणि नियामकांकडून त्याचं संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा दबाव देखील आहे. त्याच दृष्टीने हे पाऊल उचललं जात आहे. Smartphone चोरी झाल्यास, या सरकारी पोर्टलच्या मदतीने असा करा ब्लॉक ब्लूमबर्गने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेन फिट्जपॅट्रिक यांनी व्हर्चुअल इव्हेंटमध्ये, आम्ही युजर्सची कोणतीही वैयक्तिक माहिती विकत नसल्याचं सांगितलं. तसंच गुगल इव्हेंटमध्ये इतर गोपनीयता आणि देखरेखीच्या वैशिष्ट्यांविषयी माहितीही देण्यात आली. यात पासवर्ड सुरक्षा आणि अँड्रॉईड डिव्हाईससाठी डेटा उपयोग परवानगीबाबत इतर टूलही सामिल आहेत. गुगल सर्च हिस्ट्री क्विक डिलीट कशी कराल? - गुगल अकाउंट प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा. एक ड्रॉप-डाउन मेन्यू दिसेल. - 'डिलीट लास्ट 15 मिनिट्स' वर क्लिक करा आणि युजरची सर्वात शेवटची सर्च हिस्ट्री डिलीट होईल. ऑटो डिलीट कंट्रोलसह युजर वेळेची निवड करू शकतो. आणि त्या कालावधीतील कोणताही सर्च डेटा डिलीट होईल. ऑटो डिलीट कंट्रोल लोकेशन हिस्ट्री आणि वेब, अ‍ॅप संबंधी डेटाही युजरला डिलीट करण्यासाठी लागू आहे. दरम्यान, मे 2019 मध्ये गुगलने युजर्सच्या प्रायव्हसीकडे लक्षकेंद्रीत करत, गुगल सर्च फंक्शनमध्ये डेटा कंट्रोलसाठी अनेक फीचर जोडले होते. 2019 मध्ये प्रायव्हसी फीचरची सुरुवात करताना गुगलने एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, की गुगल अकाउंटमध्ये लोकेशन हिस्ट्री आणि वेब आणि इतर अ‍ॅप संबंधी बाबी सहजपणे ऑन-ऑफ करण्यासाठीची सुविधा मिळाली आहे आणि युजर्सला हवं असल्यास ते सर्व डेटा मॅन्युअली डिलीट करू शकतात. त्याशिवाय आम्ही ऑटो-डिलीटची घोषणा करत आहोत, जो तुमचा डेटा मॅनेज करणं अधिकच सोपं करेल.
First published:

Tags: Google, Porn sites

पुढील बातम्या