• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Facebook वर तुमचंही Fake Account ओपन झालंय? असं करा डिलीट

Facebook वर तुमचंही Fake Account ओपन झालंय? असं करा डिलीट

फेसबुकवर हॅकर्सकडून अनेकांची फेक, बनावट अकाउंट ओपन केली जात आहेत. अशात जर तुमचंही फेक अकाउंट तयार झाल्याचं समजल्यास या स्टेप्स फॉलो करा आणि फेक अकाउंटबद्दल तक्रार करा.

  • Share this:
    मुंबई, 31 मे: कोरोना काळात डिजीटल व्यवहारात, सोशल मीडिया (Social Media) वापरात मोठी वाढ झाली असताना दुसरीकडे फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सोशल मीडिया साईट फेसबुक (Facebook) वापरणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी कितीही फायदेशीर ठरत असला, तरी याचा वापर काळजीपूर्वक न केल्यास मोठा फटका बसू शकतो. सध्या फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडिया साईट्सवर अनेक सायबर क्रिमिनल्स (Cyber Crime) युजर्सला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. फेसबुकवर अनेकांचे प्रोफाईल हॅक (Hacking) करुन, युजरच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांकडे पैसे मागण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच सायबर पोलिसांकडे फेसबुक प्रोफाईल हॅक झाल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. डॉक्टर, पोलीस, वकील यांची बनावट प्रोफाईल तयार करुन त्यांच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मुंबई पोलीस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्याचं फेसबुक अकाउंट हॅक करुन त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील अनेकांकडे पैसे मागण्यात आले होते. 40-50 हजारांची रक्कम त्यांच्या नावे मागण्यात आली होती. परंतु याप्रकरणी संशय आल्यानंतर त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांनी त्यांना प्रत्यक्ष संपर्क केल्यानंतर, पैसे मागितले नसल्याचं त्यांनी सांगितलं. अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहे.

    (वाचा - Facebook वर कोणी तुम्हाला ट्रॅक करतंय का? या Settings ठरतील फायदेशीर)

    त्यामुळे कोणीही, फेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवरुन पैशांची मागणी केल्यास, सावध व्हा. ज्याच्या नावाने पैसे मागितले गेले, त्याला प्रत्यक्ष फोन करुन माहिती करुन घ्या, असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे. कोणालाही तुमची पर्सनल माहिती देऊ नका, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. फेसबुकवर हॅकर्सकडून अनेकांची फेक, बनावट अकाउंट ओपन केली जात आहेत. अशात जर तुमचंही फेक अकाउंट तयार झाल्याचं समजल्यास या स्टेप्स फॉलो करा आणि फेक अकाउंटबद्दल तक्रार करा. - तुमचं फेसबुकचं फेक अकाउंट बनल्याचं (Facebook Fake Account) समजल्यास, तुमच्या स्वत:च्या अकाउंटवर ते फेक प्रोफाईल शोधा किंवा तुमच्या मित्रांना त्या फेक अकाउंटची लिंक पाठवण्यास सांगा. - त्यानंतर फेक अकाउंटच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. - Find support or report profile यावर क्लिक करा. - pretending to be someone या पर्यायावर क्लिक करा. - त्यानंतर तीन पर्याय दिसतील. me, a friend, celebrity असे पर्याय दिसतील. - तुमचं प्रोफाईल फेक असल्यास, Me वर क्लिक करा. - काही वेळातच तुमचं फेक अकाउंट बंद होईल. त्यानंतर तुमच्या खऱ्या प्रोफाईलवर फेक अकाउंटबाबत माहिती द्या.

    (वाचा - Facebook वर तुमचं प्रोफाईल कोणी चेक केलं? असं घ्या जाणून)

    तुमचं फेसबुक अकाउंट कसं सुरक्षित ठेवाल - - तुमची फ्रेंडलिस्ट स्वत:साठीच ओपन ठेवा. तुमचे फ्रेंड्स इतरांना दिसू नये यासाठी who can see your friend list मध्ये only me हा पर्याय निवडा. - फोटो, व्हिडीओ डाउनलोड न होण्यासाठी lock your profile वर क्लिक करा. - अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठीचा पर्याय बंद करा. केवळ friends of friends हा पर्याय ठेवा. - तसंच फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी two-factor authentication ऑन ठेवा. - तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी इतरांना दिसू नये, यासाठी only me पर्याय निवडा.
    Published by:Karishma Bhurke
    First published: