• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Microsoft चा Foldable Smartphone Surface Duo लाँच; ट्रिपल कॅमेरासह जबरदस्त फीचर्स, काय आहे किंमत

Microsoft चा Foldable Smartphone Surface Duo लाँच; ट्रिपल कॅमेरासह जबरदस्त फीचर्स, काय आहे किंमत

Samsung, Motorola ला टक्कर देत Microsoft नेही आपला नवा फोल्डेबल स्मार्टफोन Surface Duo 2 लाँच केला आहे. कंपनीने दोन स्क्रिनसह हा फोन जबरदस्त फीचर्ससह बाजारात आणला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : Samsung आणि Motorola ने आपले Foldable Smartphone लाँच केले आहेत. आता Samsung, Motorola ला टक्कर देत Microsoft नेही आपला नवा फोल्डेबल स्मार्टफोन Surface Duo 2 लाँच केला आहे. कंपनीने दोन स्क्रिनसह हा फोन जबरदस्त फीचर्ससह बाजारात आणला आहे. स्मार्टफोनच्या युगात नवनवं तंत्रज्ञान बाजारात येत असताना आता कंपन्यांनी वेगळी शक्कल लढवत Foldable Smartphone ची निर्मिती केली आहे. Samsung, Motorola या कंपन्यांनी त्यांचे फोन लाँच केले आहेत. आता Microsoft नेही फोन लाँच केला आहे. Microsoft Surface Duo 2 Foldable Phone Specifications - - 8.3 इंची स्क्रिन असून ती फोल्ड केल्यानंतर 5.8 इंची होते. - 2754*1896 पिक्सल रिजोल्यूशन - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर - Android 11 - Microsoft Surface Duo 2 ची दुसरी स्क्रिन कंट्रोलर रुपात काम करेल.

  आता येतोय Apple चा फोल्डेबल iPhone; 8 इंची डिस्प्लेसह मिळणार पेन्सिल सपोर्ट

  कॅमेरा - या फोनला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर 12MP वाइड अँगल लेन्स आहे. दुसरा 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तर तिसरा 12MP टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 12MP सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ब्लूट्यूथ 5.1, GPS, Wifi 6 देण्यात आलं आहे.

  फोल्डेबल फोनसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या किती असेल किंमत

  Microsoft Surface Duo 2 तीन वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. पहिला वेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह आहे. याची किंमत जवळपास 1,10,660 रुपये आहे. दुसरं वेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह असून याची किंमत जवळपास 1,18,041 रुपये आहे. तर तिसरं मॉडेल 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह असून याची किंमत 1,32,806 रुपये असू शकते.
  Published by:Karishma
  First published: