आता येतोय Apple चा फोल्डेबल iPhone; 8 इंची डिस्प्लेसह मिळणार पेन्सिल सपोर्ट

आता येतोय Apple चा फोल्डेबल iPhone; 8 इंची डिस्प्लेसह मिळणार पेन्सिल सपोर्ट

प्रोग्रेसिव्ह स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आपली एन्ट्री मार्क करून, apple चा फोल्डेबल आयफोन अ‍ॅपलसाठी गेम चेंजर ठरू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मार्च : अ‍ॅपल (Apple) लवकरच फोल्डेबल आयफोन (foldable iPhone) आणण्याच्या तयारीत आहे. पॉप्युलर अ‍ॅनालिस्ट मिंग-ची कुओ (Ming-Chi Kuo) यांनी, कंपनी 2023 मध्ये 7.5-8 इंची डिस्प्ले डिव्हाईस लाँच करणार असल्याचा दावा केला आहे. मॅकरुमर्सने दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये कंपनी हे नवं डिव्हाईस लाँच करू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, 7.3-7.6 इंची डिस्प्लेसह फोल्डेबल आयफोनमध्ये अ‍ॅपल पेन्सिलचाही सपोर्ट दिला जाऊ शकतो. अ‍ॅपल 2016 पासून फोल्डेबल डिव्हाईसबाबत रिसर्च करत आहे. परंतु कंपनीने अधिकृतरित्या याच्या लाँचिंगबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

(वाचा - ऑटोमध्येच थाटला संसार; आनंद महिंद्रांनीही PHOTO शेअर करत केलं कौतुक)

Apple चा अपकमिंग प्लॅगशिप फोनच्या लीक रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅपलचा फोल्डेबल स्मार्टफोन इतर ब्रँड्सच्या तुलनेत कमी किंमतीत असू शकतो. अ‍ॅपलचा हा फोल्डेबल फोन बाजारात आल्यास, त्याची सॅमसंगच्या गॅलेक्सी फोल्ड 2 सह बरोबरी होईल.

(वाचा - म्हणून iPhone पेक्षा अँड्रॉइड बरा, Bill gates यांनी सांगितलं कारण)

प्रोग्रेसिव्ह स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आपली एन्ट्री मार्क करून, apple चा फोल्डेबल आयफोन अ‍ॅपलसाठी गेम चेंजर ठरू शकतो. अ‍ॅपलच्या फोल्डेबल आयफोन एन्ट्रीने सॅमसंग आणि LG फोल्डेबल स्मार्टफोनला चांगलीच टक्कर ठरू शकते.

दरम्यान, सॅमसंगने आतापर्यंत अनेक सिरिज मार्केटमध्ये लाँच केल्या मात्र फोल्डेबल मोबाईल फोन तयार करणारी जगातील एकमेव कंपनी आहे. सॅमसंग (Samsung) कंपनी आता आपल्या स्ट्रेचेबल फोनबद्दल चर्चेत आहे. कंपनीने एक वर्षापूर्वी स्ट्रेचेबल फोनची घोषणा केली होती. दक्षिण कोरियामध्ये कंपनीचे अध्यक्ष ली जै योंग यांच्याकडे हा रहस्यमय फोन दिसला. महत्त्वाचं म्हणजे सॅमसंगने जागतिक बाजारात प्रथम स्ट्रेचेबल स्मार्टफोन लाँच करण्यासाठी पेटंट राइटसाठी नाव नोंदवलं आहे. मात्र या फोनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Published by: Karishma Bhurke
First published: March 3, 2021, 1:45 PM IST

ताज्या बातम्या