मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

हे जबरदस्त smartphone स्वस्तात घेण्याची आज शेवटची संधी; Amazon, SBI ची खास ऑफर

हे जबरदस्त smartphone स्वस्तात घेण्याची आज शेवटची संधी; Amazon, SBI ची खास ऑफर

स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India-SBI) ग्राहक असाल, तर आज अ‍ॅपल आयफोन, सॅमसंग यासह अनेक नामांकित ब्रँडसचे स्मार्टफोन (Smartphones) अतिशय स्वस्त किंमतीत अ‍ॅमेझॉनवर (Amazon) खरेदी करता येतील.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India-SBI) ग्राहक असाल, तर आज अ‍ॅपल आयफोन, सॅमसंग यासह अनेक नामांकित ब्रँडसचे स्मार्टफोन (Smartphones) अतिशय स्वस्त किंमतीत अ‍ॅमेझॉनवर (Amazon) खरेदी करता येतील.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India-SBI) ग्राहक असाल, तर आज अ‍ॅपल आयफोन, सॅमसंग यासह अनेक नामांकित ब्रँडसचे स्मार्टफोन (Smartphones) अतिशय स्वस्त किंमतीत अ‍ॅमेझॉनवर (Amazon) खरेदी करता येतील.

नवी दिल्ली, 30 मार्च : स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India-SBI) ग्राहक असाल, तर आज अ‍ॅपल आयफोन, सॅमसंग यासह अनेक नामांकित ब्रँडसचे स्मार्टफोन (Smartphones) अतिशय स्वस्त किंमतीत अ‍ॅमेझॉनवर (Amazon) खरेदी करता येतील. स्टेट बँक ग्राहकांना थेट 10 टक्के सवलत आहेच. त्याशिवाय क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करून खरेदी केल्यास आणखी 5 टक्के सवलत मिळणार आहे. अ‍ॅपल आयफोन (Apple iphone), सॅमसंग (Samsung) यासह रेडमी (Redmi), वनप्लस (One plus), ओप्पो (Oppo), विवो (Vivo), एलजी (LG), नोकिया (Nokia) अशा सर्व ब्रँडसचे स्मार्टफोन्स सवलतीच्या किंमतीत मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, स्टेट बँक ग्राहकांनी किमान 5 हजार रुपयांचा व्यवहार करणं बंधनकारक असून, प्रत्येक कार्डवर जास्तीत जास्त 1 हजार रुपये सवलत मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना स्टेट बँकेच्या योनो अ‍ॅपमध्ये (SBI YONO app) लॉग इन करणं आवश्यक आहे. लॉग इन केल्यानंतर बेस्ट ऑफर सेक्शनमध्ये (Best Offer Section) जाऊन तिथून अ‍ॅमेझॉनवर जावं लागेल. अ‍ॅमेझॉनवर स्टेट बँकेच्या ऑफर अंतर्गत मिळणाऱ्या मोबाइलवर ईएमआय (No cost EMI) सवलतही असून, त्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही.

कोणत्या मोबाईलवर किती सवलत -

स्टेट बँकेचे ग्राहक या विशेष सवलती अंतर्गत अगदी नवीन लाँच झालेले स्मार्टफोनदेखील कमी किंमतीत खरेदी करू शकतात. यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम 12 (Samsung Galaxy M12) हा फोन 10 हजार 999 रुपयांमध्ये, तर रेडमी नोट 10 (Redmi Note 10) हा फोन 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

रेडमी 9 (Redmi 9) ची किंमत 8 हजार 799 रुपये, वनप्लस नॉर्ड 5 जी (OnePlus Nord 5G) किंमत 29 हजार 999 रुपये आहे.

(वाचा - देशात प्रत्येक तिसरं DL बनावट; तुमचं Driving Licence खरं की खोटं? असं ओळखा)

सॅमसंग गॅलेक्सी एम 31 एस (Samsung Galaxy M31s) 18 हजार 499 रुपये, रेडमी 9 पॉवर (Redmi 9 Power) 10 हजार 499 रुपये, सॅमसंग गॅलेक्सी एम 51 (Samsung Galaxy M51) हा फोन 21 हजार 749 रुपये, वनप्लस 8 टी 5 जी (OnePlus 8T 5G) 42 हजार 999 रुपये किमतीत उपलब्ध आहे.

आयफोन मिनीची (iPhone mini) किंमत 67 हजार 100 रुपये असून, सॅमसंग गॅलेक्सी M02 (Samsung Galaxy M02) ची किंमत 7 हजार 499 रुपये, वन प्लस 8 प्रो 5जी (One Plus 8 Pro 5G) ची किंमत 54हजार 999 रुपये आहे.

याशिवाय ओप्पो ए 31 (Oppo A31) 9 हजार 990 रुपये, रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note 9 Pro) 12 हजार 999 रुपये, रेडमी 9 ए (Redmi 9A) 6 हजार 799 रुपये, विवो वाय 91 (Vovo Y91i) 7 हजार 490 रुपये, विवो वाय 11 (Vivo Y11) 8 हजार 490 रुपये, एलजी डब्ल्यू 41 (LG W41) 12 हजार 990 रुपये, ओप्पो ए 15 (Oppo A15s) 11 हजार 490 रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए 12 (Samsung Galaxy A12) 12 हजार 999 रुपये, ओप्पो ए 15 (Oppo A15) 9 हजार 990 रुपये, सॅमसंग गॅलेक्सी एम 11 (Samsung Galaxy M11) 10 हजार 990 रुपये, ओप्पो ए 11 (Oppo A11) 8 हजार 490 रुपये, नोकिया 3.4 (Nokia 3.4) 11 हजार 999 रुपये, विवो वाय 12 एस (Vivo Y12s) 9 हजार 990 रुपये, विवो वाय 20 (Vivo Y20) 11 हजार 490 रुपये अशा किमतीत हे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.

(वाचा - Video: उन्हाळ्याच्या दिवसात वापरा AC Helmet, बायकर्ससाठी खास गॅजेट, किंमतही कमी)

याशिवाय स्टेट बँकेचे कार्डधारक एमआय 10i (Mi 10i) हा स्मार्टफोन 21 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात, तर सॅमसंग गॅलेक्सी ए  32 (Samsung Galaxy A32) 21 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

ओप्पो एफ 19  (Oppo F19) 25 हजार 990 रुपयांमध्ये तर, ओप्पो एफ 19 प्रो (Oppo F19 Pro) 21 हजार 490 रुपयांमध्ये मिळेल. विवो व्ही 20 (Vivo V20) 19 हजार 990 रुपये, ओप्पो एफ 17 (Oppo F17) 16 हजार 990 रुपये, विवो वाय 51 (Vivo Y51) 17 हजार 990, विवो वाय 31 (Vivo Y31) 16 हजार 490 रुपये, विवो वाय 30 (Vivo Y30) 13 हजार 990 रुपये, ओप्पो ए 52 (Oppo A52) 14 हजार 990 रुपये, ओप्पो ए 53 (Oppo A53) 12 हजार 990 रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

क्रेडीट कार्ड धारकांसाठी आयफोन 11 प्रो मॅक्सची किंमत 94 हजार 900 रुपये असून, आयफोन 12 ची किंमत एक लाख 19हजार 900 रुपये आहे.

(वाचा - तब्बल 30 दिवस पाण्यात पडून होता हा फोन, मात्र काहीच झालं नाही; जाणून घ्या किंमत)

सॅमसंग गॅलेक्सी एस 21 (Samsung Galaxy S21) हा फोन 81 हजार 991 रुपये, तर वन प्लस 8 प्रो (One Plus 8 Pro) हा फोन 54 हजार 999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

सॅमसंग ए 72 (Samsung A72) ची किंमत 41 हजार 999 रुपये, सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्राची किंमत एक लाख 4 हजार 999 रुपये, तर एमआय 10 प्रोची किंमत 37 हजार 999 रुपये, तर आयफोन 12 मिनीची किंमत 67 हजार 100 रुपये इतकी आहे.

सवलतीच्या किमतीत आपला आवडता स्मार्टफोन घेण्याची ही सुवर्णसंधी आजचाच दिवस असल्यानं ताबडतोब स्टेट बँकेच्या योनो अ‍ॅपवर लॉग-इन करा आणि खरेदी करा आपला आवडता स्मार्टफोन.

First published:

Tags: Amazon, Apple, Bank services, Discount offer, Oppo, Sale offers, Samsung galaxy, SBI, Smartphone