नवी दिल्ली, 29 मार्च : उन्हाळ्याच्या दिवसात बाईक चालवणाऱ्यांसाठी हेल्मेट घालून बाईक चालवणं अतिशय कठिण ठरतं. उन्हाळा जास्त असताना, हेल्मेट लावल्याने डोक्याजवळ गर्मी अधिक वाढते. अनेकदा बाईक चालवणारे घामापासून, उन्हापासून काही प्रमाणात वाचण्यासाठी रुमाल किंवा एखाद्या कपड्याचा वापर करतात. यामुळेही तितकासा फायदा होत नाही. परंतु आता या समस्येपासून सुटका होऊ शकते. मद्रासच्या IIT पास आउट पी. के सुंदरराजन यांनी एक असं गॅजेट बनवलं आहे, जे हेल्मेटच्या आत डोक्याला एकदम थंड ठेवेल.
कसं तयार केलं गॅजेट -
कर्नाटकातील बंगळुरू येथे राहणाऱ्या पी. के सुंदरराजन यांनी IIT मद्रासमधून ग्रॅज्युएशन केलं आहे. पासआउट झाल्यानंतर त्यांना आपल्या सोसायटीसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यानंतर त्यांना कल्पना आली, की असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे बाईक चालवणाऱ्यांना उन्हाळ्यात हेल्मेटमुळे त्रास होणार नाही. सुंदरराजनने आपल्या टीमसह मिळून मे 2017 मध्ये या गॅजेटसाठी प्रोटोटाइप बनवण्यास सुरुवात केली आणि जवळपास 50 प्रोटोटाइप बनवल्यानंतर शेवटी त्यांना यश मिळालं आणि हेल्मेट थंड ठेवणारं गॅजेट तयार झालं.
BluArmor कसं काम करतं -
BluArmor असं याचं नाव असून सुंदरराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गॅजेट हेल्मेटमध्ये 360 डिग्री डायमेंशनमपर्यंत थंडावा देतं आणि हे USB चार्जरच्या मदतीने चार्ज केलं जाऊ शकतं. BluArmor चा बॅटरी बॅकअप जवळपास 10 तास आहे. हे गॅजेट गर्मीच्या दिवसात हेल्मेट घातल्यानंतर बायकर्सचं डोकं थंड ठेवण्यास मदत करेल.
कसं खरेदी करता येईल BluArmor -
हेल्मेटला थंड ठेवणारं हे गॅजेट सर्व ई-कॉमर्स वेबसाईट्सवर मिळेल. याची किंमत 2200 रुपये इतकी आहे. सुंदरराजनने बनवलेल्या या गॅजेटची मागणी केवळ भारतातच नाही, तर थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, कुवेत, सौदी अरब, दुबईसह अमेरिकेतही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike riding