नवी दिल्ली, 30 मार्च : नवीन मोटर व्हिकल अॅक्ट लागू झाल्यानंतर देशभरात ट्रॅफिक नियम कडक करण्यात आले आहेत. आता ट्रॅफिक नियम मोडल्यास, कठोर शिक्षा आणि मोठा दंड भरावा लागू शकतो. अशात जर चेकिंगवेळीच तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट आहे, असं समजलं तर? मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स खरं कि खोटं आहे हे ओळखणं महत्त्वाचं आहे. जाणून घ्या ड्रायव्हिंग लायसन्स खरं की खोटं जाणून घेण्याची सोपी पद्धत...
देशात प्रत्येक तिसरं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट -
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 2019 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान, देशात प्रत्येक तिसरं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट असल्यांचं सांगितलं होतं. अशात नवीन मोटर व्हिकल अॅक्ट बनावट ड्रायव्हिंग लायसन्सवर रोख लावण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. नवीन मोटर व्हिकल अॅक्ट लागू झाल्यानंतर, ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या पद्धतींमध्ये मोठा बदल झाला आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईनही अर्ज करता येऊ शकतो. ज्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स बजावट नाही याचा पूर्ण विश्वास होता.
रस्ते अपघातात ट्रेंड ड्रायव्हरची मोठी भूमिका -
दरवर्षी देशात 1.5 लाखहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ज्यात सर्वाधिक अपघात ट्रेंड नसलेल्या ड्रायव्हर्समुळे होतात. अशात जर टेस्ट देवून आणि आरटीओ विभागाच्या सर्व नियमांचं पालन करून ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त केलं, तर अपघाताची शक्यता अतिशय कमी होते. आरटीओ ड्रायव्हिंग लायसन्स देण्यापूर्वी वाहन चालवण्यास वाहन चालण्यास सांगतात, अशा टेस्टमध्ये पास न झाल्यास ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जात नाही.
असं जाणून घ्या बनावट ड्रायव्हिंग लायसन्सबाबत -
- सर्वात आधी https://parivahan.gov.in/parivahan/# या वेबसाईटवर लॉगइन करावं लागेल.
- येथे ऑनलाईन सर्विसवर क्लिक करावं लागेल.
- Driving license सर्विस असा ऑप्शन दिसेल.
- या ऑप्शनवर क्लिक करुन, select state असा पर्याय येईल, येथे आपलं राज्य सिलेक्ट करा.
- त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, समोर Driving license चा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर Service on DL ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- समोर Continue ऑप्शन दिसेल, येथे क्लिक करुन आणखी एक विंडो ओपन होईल.
- ज्यात तुमचा DL नंबर आणि जन्म तारीख आणि राज्य निवडावं लागेल.
- या प्रोसेसनंतर ओके केल्यावर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात DL चे डिटेल्स समोर येतील. DL चे डिटेल्स समोर आले नाहीत, तर तुमचं लायसन्स बनावट असल्याचं समजावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Driving license, Fake, Financial fraud, Identity verification, Tech news