• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तब्बल 30 दिवस पाण्यात पडून होता हा फोन, मात्र काहीच झालं नाही; जाणून घ्या किंमत

तब्बल 30 दिवस पाण्यात पडून होता हा फोन, मात्र काहीच झालं नाही; जाणून घ्या किंमत

हा फोन तब्बल 30 दिवस पाण्यात राहूनही चालू स्थितीत राहिल, यावर विश्वास ठेवणं कदाचित कठिण वाटू शकतं. परंतु असं घडलं आहे. एक 50 वर्षीय महिला मासेमारीसाठी गेली असताना, तिचा iPhone 11 सरोवरात पडला होता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 मार्च : अ‍ॅपलने iPhone 11 सीरीज वॉटरप्रुफ असल्याचं सांगितलं. परंतु हा फोन तब्बल 30 दिवस पाण्यात राहूनही चालू स्थितीत राहिल, यावर विश्वास ठेवणं कदाचित कठिण वाटू शकतं. परंतु असं घडलं आहे. कॅनडातील एक 50 वर्षीय महिला मासेमारीसाठी गेली असताना, तिचा iPhone 11 सरोवरात पडला. 50 वर्षीय एंजी कॅरियर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कॅनडातील एका सरोवरावर मासेमारी करण्यासाठी गेल्या होत्या. जोरात आल्याने वाऱ्यामुळे त्यांचा फोन सरोवरात पडला. फोन पाण्यात पडल्यानंतर त्यांनी तो परत मिळण्याची आशाच सोडली होती. परंतु फोनमध्ये महत्त्वाचे फोटो असल्याने त्या पुन्हा काही दिवसांनी सरोवरावर गेल्या. कॅरियर यांनी एका फिश फाइंडरचा उपयोग करून दोन तास फोनची शोधाशोध केली आणि लोहचुंबकाच्या मदतीने त्या फोन पाण्यातून वर काढण्यात यशस्वी झाल्या. 30 दिवसांनंतर त्यांना फोन तर मिळाला, पण इतके दिवस फोन पाण्यात राहिल्याने तो सुरू होईल असं त्यांना वाटत नव्हतं. परंतु त्यानंतर जे झालं, ते हैराण करणारं होतं. त्यांचा iPhone बूट झाला आणि त्यानंतर लगेचच तो चालू स्थितीत असल्याचंही समजलं. iPhone 11 pro डिव्हाईस 30 दिवस पाण्यात राहिल्यानंतरही चालू स्थितीत राहू शकतो, असं कोणालाही वाटलं नाही.

  (वाचा - Apple Alert! ऑफरमध्ये स्वस्त दरात iPhone खरेदी करताना सावधान; अशी होतेय फसवणूक)

  दरम्यान, ही घटना पहिल्यांदाच झालेली नाही. याआधीही आयफोन 11 सहा महिने पाण्यात राहिल्याची घटना इंटरनेटवर समोर आली होती. काय आहेत Apple iPhone 11 pro फीचर आणि किंमत - - iPhone 11 pro फोनला सुपर रेटिना XDR 5.8 इंची डिस्प्ले देण्यात आला आहे. - यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून 12 MP वाईड कॅमेरा, 12MP टेलीफोटो लेन्स आणि अल्ट्रा वाईड फोटोग्राफीसाठी 12MP लेन्स आहे. फ्रंट कॅमेराही 12MP असून 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्लो-मोशन फीचर देण्यात आलं आहे. - हा फोन A13 बायॉनिक चिपसेटवर असून बॅटरी लाईफ पाच तासांहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. - भारतात iPhone 11 pro ची किंमत 99,900 रुपये आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: