• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आजपासून iPhone 13 सीरिजसाठी प्री-बुकिंग सुरू, असा मिळेल डिस्काउंट

आजपासून iPhone 13 सीरिजसाठी प्री-बुकिंग सुरू, असा मिळेल डिस्काउंट

आजपासून iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 mini भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : Apple ने नुकतंच iPhone 13 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये iPhone 13 सह Watch series 7 आणि ipad ही लाँच करण्यात आले. आजपासून iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 mini भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. iPhone 13 सीरिज Pre-order साठी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, जर्मनी, जपान, युके आणि जगभरातील 30 हून अधिक देश आणि भागांमध्ये लाइव्ह होणार आहे. तसंच पहिल्यांदाच पहिल्या टप्प्यात iPhone सीरिज भारतात सेलसाठी उपलब्ध झाली आहे. Apple आज 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 mini साठी प्री-ऑर्डर सुरू करणार आहे. ग्राहक Apple Online Store आणि ई-कॉमर्स साइटसह देशभरातील रिटेल स्टोरच्या माध्यमातून नवं आयफोन मॉडेल प्री-ऑर्डर करू शकतात. आजपासून Amazon आणि Flipkart आपल्या साइटवर प्री-ऑर्डर घेण्यास सुरुवात करतील.

  आयफोन खरेदीची सुवर्णसंधी, iPhone 13 लाँच होताच स्वस्त झाला iPhone 11

  भारतात iPhone 13 बेस 128GB वेरिएंटची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. तर iPhone 13 च्या 256GB वेरिएंटची किंमत 89,900 आणि 512GB ची किंमत 1,09,900 रुपये आहे. त्याशिवाय iPhone 13 pro च्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,19,900 रुपये आहे. याच्या 256GB वेरिएंटची किंमत 1,29,900 आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,49,900 रुपये आहे. iPhone 13 Pro च्या 1TB वेरिएंटची किंमत 1,69,900 रुपये आहे. तर iPhone 13 Pro Max च्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,29,900 रुपये आहे. iPhone 13 Pro Max च्या 256GB मॉडेलची किंमत 1,39,900 रुपये, 512GB वेरिएंटची किंमत 1,59,900 रुपये आणि iPhone 13 Pro Max च्या 1TB स्टोरेजची किंमत 1,79,900 रुपये आहे. iPhone 13 सीरिजमध्ये सर्वात स्वस्त iPhone 13 Mini आहे. याच्या 128GB वेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे. तर 256GB स्टोरेजची किंमत 79,900 रुपये आणि 512GB स्टोरेज 99,900 रुपयांना आहे.

  iPhone प्रेमींसाठी वाईट बातमी! कंपनीने बंद केले हे 3 iPhone, आता कधीच नाही करता येणार खरेदी

  iPhone 13 Series Offers - HDFC बँक कार्डचा वापर करुन Apple Authorised Distributor च्या माध्यमातून iPhone 13 आणि iPhone 13 mini pre-order करणाऱ्या ग्राहकांना 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसंच HDFC बँक कार्डद्वारे iPhone 13 pro आणि iPhone 13 pro max खरेदीवर 5000 चा डिस्काउंट मिळेल. जुन्या मॉडेलच्या एक्सचेंजवर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. ग्राहकांना iPhone 13 खरेदीसाठी EMI चा पर्यायही उपलब्ध आहे.
  Published by:Karishma
  First published: