Home /News /technology /

आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डिस्प्लेसह Apple Watch Series 7 लाँच, पाहा काय आहे खास, किती आहे किंमत

आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डिस्प्लेसह Apple Watch Series 7 लाँच, पाहा काय आहे खास, किती आहे किंमत

Apple Watch Series 7 क्रॅक रेसिस्टेंट डिस्प्ले आणि डस्ट रेसिस्टेंटसह आहे. हे वॉच OS 8 वर काम करतं.

  नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : Apple ने आपल्या iPhone 13 सीरिजसह आपली नवी Apple Watch Series 7 लाँच केली आहे. नवं स्मार्टवॉच री-इंजिनियर Always-On रेटिना डिस्प्लेसह आहे. यात आधीच्या तुलनेत अधिक स्क्रिन एरिया आणि पातळ बॉर्डर आहे. Apple Watch Series दोन 41mm आणि 45mm साइजमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. डायमेंशनमध्ये अधिक बदल न करता, Apple ने याचा स्क्रिन एरिया अधिक मोठा केला आहे. Apple Watch Series 7 क्रॅक रेसिस्टेंट डिस्प्ले आणि डस्ट रेसिस्टेंटसह आहे. हे वॉच OS 8 वर काम करतं. ग्राहकांना ही वॉच सीरिज सिल्व्हर, ग्रेफाइट आणि गोल्ड स्टेनलेस स्टील कलरमध्ये मिळेल. Apple आणखी कलर ऑप्शनही यात आणणार आहे. iPhone 13 सीरिजप्रमाणे नवी Apple Watch सीरिज 7 S7 चिपसेटसह लाँच करण्यात आली आहे. हे वॉच ECG आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटरसारख्या सुविधांसह येतं. याला फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 8 मिनिटांत चार्ज होऊन जवळपास 8 तासांचं स्लिप ट्रॅकिंग याद्वारे केलं जातं. हे स्मार्टवॉच 45 मिनिटांत 0 से 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येत असल्याचा दावा Apple ने केला आहे.

  iPhone 13 Mini नव्या सीरिजमधील सर्वात स्वस्त आयफोन, काय आहे किंमत

  नवी Apple Watch Series 7 ला 399 डॉलर जवळपास 29,379 रुपयांत लाँच करण्यात आलं आहे. त्याशिवाय आता Apple Series 3 ची किंमत 199 डॉलर जवळपास 14,653 रुपये केली आहे. Apple Watch SE ची किंमत 279 डॉलर जवळपास 20,543.66 रुपये आहे. Apple Watch Series 7 यावर्षाअखेरीस उपलब्ध केली जाईल. Apple launch event मध्ये iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, iPhone 13 Mini, Phone 13 Mini. Apple Watch Series 7, iPad Mini आणि iPad 2021 लाँच करण्यात आले आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Smartphone

  पुढील बातम्या