नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : Apple ने आपल्या कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग इव्हेंटमध्ये iPhone 13 Series , Apple Watch series 7 सह iPad आणि iPad mini लाँच केले. नव्या iPad मध्ये A13 बायोनिक चिप आहे, जी आधीच्या मॉडेलपेक्षा 20 टक्क्यांहून अधिक फास्ट CPU, GPU आणि न्यूरल इंजन परफॉर्मन्स देण्याचा दावा कंपनीने केला आहे. हा iPad नवव्या जनरेशनचा iPad आहे. iPad mini चं डिझाइन पूर्णपणे नवं असून याचा लूक iPad air आणि iPad pro प्रमाणे आहे. नव्या iPad मध्ये 10.2 इंची डिस्प्ले देण्यात आला आहे, जो आधीच्या iPad मॉडेल्समध्येही उपलब्ध होता. परंतु या डिस्प्लेमध्ये ट्रू टोन सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यात स्क्रिन कलर टेम्परेचर अॅडजस्ट करण्यास मदत होते. यामध्ये असलेली A13 बायोनिक चिप पहिल्यांदा iPhone 11 मध्ये देण्यात आली होती. यात टच ID होम बटण तसंच देण्यात आलं आहे, जे आधीच्या iPad मध्येही देण्यात आलं होतं. नव्या Apple iPad मध्ये पूर्णपणे नवा कॅमेरा देण्यात आला आहे. यात 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे, जो 122 डिग्री व्ह्यू देतो. याच्या बॅकला 8 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर आहे.
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डिस्प्लेसह Apple Watch Series 7 लाँच, पाहा काय आहे खास, किती आहे किंमत
देशात नव्या iPad ची किंमत wifi मॉडेलसाठी 30,900 रुपयांपासून सुरू होते. याच्या wifi आणि सेल्युलर मॉडेलची सुरुवातीची किंमत 42,900 रुपये आहे. यात 64GB पासून पुढे स्टोरेज ऑप्शन असून दोन कलमध्ये नवा iPad उपलब्ध आहे.
Apple event : जुनी बाटली नवी दारू, अखेर iphone 13 लाँच, काय आहे नवं?
iPad mini ची किंमत wifi मॉडेलसाठी 46,900 रुपयांपासून सुरू होते. याच्या wifi सेल्युलर मॉडेलची सुरुवातीची किंमत 60,900 रुपये आहे. iPad mini 64GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शनसह पाच कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.