Home /News /technology /

iPhone प्रेमींसाठी वाईट बातमी! कंपनीने बंद केले हे 3 iPhone, आता कधीच नाही करता येणार खरेदी

iPhone प्रेमींसाठी वाईट बातमी! कंपनीने बंद केले हे 3 iPhone, आता कधीच नाही करता येणार खरेदी

बंद करण्यात आलेल्या तीनही स्मार्टफोनचे रिफर्बिश्ड यूनिट्स काही थर्ड-पार्टी वेबसाईटवर अद्यापही उपलब्ध आहेत. परंतु कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हे तीन फोन बंद करण्यात आले आहे.

  नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : iPhone 13 सीरिज लाँच झाल्यानंतर Apple ने काही जुने iPhone मॉडेल्स बंद केले आहेत. नवी सीरिज लाँच झाल्यानंतर जुने मॉडेल्स बंद करणं ही कंपनीची आधीपासून पॉलिसी आहे. यावेळी कंपनीने iPhone XR, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max बंद केले आहेत. या तीनही स्मार्टफोनचे रिफर्बिश्ड यूनिट्स काही थर्ड-पार्टी वेबसाईटवर अद्यापही उपलब्ध आहेत. परंतु कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हे तीन फोन बंद करण्यात आले आहे. Apple ने 14 सप्टेंबरला एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये iPhone 13 सीरिज लाँच केली. यात चार नवे स्मार्टफोन iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro MaX लाँच करणयात आले. तीनही फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी आहे. यात कंपनीने A15 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. फोनला जबरदस्त कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. iPhone 13 आणि iPhone 13 mini मध्ये डुअल आणि प्रो वेरिएंटमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

  किडनीसोबत काय काय विकावं लागणार? लोकांचा प्रश्न; iPhone13 लाँचनंतर मीम्सचा पाऊस

  नव्या सीरिजमध्ये 64GB कोणताचं वेरिएंट लाँच करण्यात आलेला नाही. iPhone 13 series च्या स्मार्टफोनचे बेस वेरिएंट 128GB पासून आहेत. Pro Max वेरिएंटसह कंपनी 1TB मॉडेल ऑफर करत आहे. iPhone 13 series सेल भारतात 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे याची सुरुवातीची किंमत 69,900 रुपये आहे.

  iPhone 13 Mini नव्या सीरिजमधील सर्वात स्वस्त आयफोन, जबरदस्त कॅमेरासह मिळेल 512 GB पर्यंत स्टोरेज; काय आहे किंमत

  iPhone 13 series सह iPad आणि iPad Mini लाँच करण्यात आले आहेत. नव्या iPad ची सुरुवातीची किंमत 30,900 रुपये आणि नव्या iPad mini ची सुरुवातीची किंमत 46,900 रुपये आहे. तसंच Apple event मध्ये कंपनीने Apple Watch Series 7 देखील लाँच केली आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Iphone, Smartphone

  पुढील बातम्या