• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • आयफोन खरेदीची सुवर्णसंधी, iPhone 13 लाँच होताच स्वस्त झाला iPhone 11

आयफोन खरेदीची सुवर्णसंधी, iPhone 13 लाँच होताच स्वस्त झाला iPhone 11

iPhone 13 लॉंच केल्यानंतर iPhone 11 आणि iPhone 12 च्या किमतीत Apple ने मोठी कपात केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : iPhone चा चाहतावर्ग मोठा आहे. Apple कंपनीने नुकतीच iPhone 13 सीरिज लॉंच केली आहे. iPhone 13 लॉंच केल्यानंतर iPhone 11 आणि iPhone 12 च्या किमतीत Apple ने मोठी कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही आयफोनचे चाहते असाल आणि 50 हजारापेक्षा कमी किमतीचा iPhone खरेदी करण्याची इच्छा असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी म्हणता येईल. iPhone 11 आणि iPhone 12 च्या किमती आता बदलल्या आहेत. iPhone 13 सीरिज बाजारात लॉंच होताच iPhone 11 आणि iPhone 12 लक्षणीयरीत्या कमी केल्या आहेत. iPhone 12 सीरिजची किंमत आता 65,900 रुपयांपासून सुरू होत असून, iPhone 11 सीरिज लॉंच झाल्यापासून अधिकृतपणे प्रथमच त्याची किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. सध्या iPhone 12, iPhone 12 mini आणि iPhone 11 च्या सर्व व्हॅरिएंट्सच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. भारतात iPhone 11 च्या 64GB व्हॅरिएंटची किंमत 49,900 रुपये, तर 128GB व्हॅरिएंटची किंमत 54,900 रुपये असेल. 2019 मध्ये iPhone 11 भारतात लॉंच करण्यात आला होता. त्यावेळी त्याची किंमत 68,500 रुपये होती. त्यामुळे तुमच्याकडे जुना iPhone असेल तर त्यात ट्रेड-इन घेऊन तुम्ही नवा iPhone 11 केवळ 38,400 रुपयांत खरेदी करू शकणार आहात. तसंच तुमच्याकडे HDFC Bank चं कार्ड असेल तर तुम्हाला या फोनच्या खरेदीवर मोठी सूट मिळेल. विशेष म्हणजे iPhone 11 ची किंमत Amazon च्या तुलनेत अधिकृत वेबसाइटवर कमी आहे.

किडनीसोबत काय काय विकावं लागणार? लोकांचा प्रश्न; iPhone13 लाँचनंतर मीम्सचा पाऊस

iPhone 13 लॉंच झाल्यानंतर iPhone 12 आणि iPhone 12 mini च्या किमतीत मोठी घट झाली आहे. iPhone 12 लॉंच केला तेव्हा त्याची किंमत 79,900 रुपये होती. आता iPhone 12 च्या 64GB व्हॅरिएंटची सुरुवात 65,900 रुपयांपासून होत आहे. iPhone 12 च्या 128GB व्हॅरिएंटच्या किमतीही आता कमी झाल्या असून, तो आता 70,900 रुपयांना उपलब्ध आहे. हे मॉडेल यापूर्वी 84,900 रुपयांना विकलं जात होतं. त्याचप्रमाणे iPhone 12 च्या 256 GB व्हॅरिएंटची किंमतही कमी झाली असून, आता हा iPhone 80,900 रुपयांना उपलब्ध असेल.

कंपनीने बंद केले हे 3 iPhone, आता कधीच नाही करता येणार खरेदी

iPhone 11 हे मॉडेल दोन वर्षं जुनं असलं तरी त्याला चांगला प्रतिसाद असून 49,900 रुपयांना त्याची खरेदी होत आहे. iPhone 11 मध्ये 6.1 इंची लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले असून, फोनमध्ये पॉवरसाठी A13 बायोनिक चिपसेट आहे. अँड्रॉइडच्या तुलनेत ही यंत्रणा अधिक वेगवान आहे. iPhone 11 चं डिस्प्ले रिझॉल्युशन 1792*828 पिक्सेल आहे. त्यात ड्युएल 12 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर आहे. 12 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर फ्रंटलाही आहे. हा फोन तीन वेगवेगळ्या व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा iPhone खरेदी करू इच्छित असाल, तर iPhone 11 हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हा स्मार्टफोन हिरव्या आणि जांभळ्या पेस्टल कलरमध्ये, तसंच पांढरा, लाल आणि काळा अशा स्टॅंडर्ड कलर्समध्येही उपलब्ध आहे.
First published: