मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Chrome चा वापर करता? मग यामुळे होणारं नुकसानही जाणून घ्याच

Google Chrome चा वापर करता? मग यामुळे होणारं नुकसानही जाणून घ्याच

बहुतेक इंटरनेट युजर माहिती शोधण्यासाठी 'गुगल क्रोम' (Google Chrome) या ब्राउझरचा वापर करतात. गुगल क्रोम हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं वेब ब्राउझर आहे. पण, या वेब ब्राउझरमध्येही काही दोष आहेत.

बहुतेक इंटरनेट युजर माहिती शोधण्यासाठी 'गुगल क्रोम' (Google Chrome) या ब्राउझरचा वापर करतात. गुगल क्रोम हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं वेब ब्राउझर आहे. पण, या वेब ब्राउझरमध्येही काही दोष आहेत.

बहुतेक इंटरनेट युजर माहिती शोधण्यासाठी 'गुगल क्रोम' (Google Chrome) या ब्राउझरचा वापर करतात. गुगल क्रोम हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं वेब ब्राउझर आहे. पण, या वेब ब्राउझरमध्येही काही दोष आहेत.

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: सध्याच्या माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात आपण मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर (Internet) अवलंबून राहू लागलो आहोत. विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली जाते. इंटरनेटवर कुठलीही माहिती शोधण्यासाठी एखाद्या वेब ब्राउझरची (Web Browser) आवश्यकता भासते. बहुतेक इंटरनेट युजर माहिती शोधण्यासाठी 'गुगल क्रोम' (Google Chrome) या ब्राउझरचा वापर करतात. गुगल क्रोम हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं वेब ब्राउझर आहे. पण, याचा अर्थ असा होत नाही की तेच सर्वोत्तम आहे, या वेब ब्राउझरमध्येही काही दोष आहेत.

युजर्सच्या प्रायव्हसीला धोका -

'आम्ही युजरच्या प्रायव्हसीची (User Privacy) काळजी घेण्यास कटिबद्ध आहोत,' असा दावा गुगलनं अनेकदा केलेला आहे. मात्र, गुगल क्रोम वेब ब्राउझरची काम करण्याची पद्धत पाहून हे सिद्ध होतं की हा दावा फोल आहे. गुगल क्रोम युजरच्या प्रायव्हसीची काळजी घेत नाही. तसं पाहिलं तर गुगल क्रोममध्ये अनेक प्रायव्हसी फोकस्ड फीचर्स (Privacy focused features) आहेत. पण, सध्याच्या काळात ते पुरेसे नाहीत. गुगलला जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणात रिव्हेन्यू (Revenue) मिळतो. या जाहिरातदारांना देण्यासाठी गुगलकडे तुमचा डेटा असणं आवश्यक आहे. यासाठी गुगल आपल्या वेब ब्राउझरचा वापर करतं.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, क्रोम तुमचा डेटा (Data) कलेक्ट करून गुगलला पुरवतं. जेव्हा तुम्ही गुगल क्रोम वापरून एखाद्या वेबसाइटवर अॅक्टिव्हिटी (website activity) करता तेव्हा तुमची अॅक्टिव्हिटी त्या वेबसाइटवर रेकॉर्ड होते. परिणामी तुमचा डेटा आरामात गुगलकडे स्टोअर होतो. गुगल अनेक प्रकारे युजरला ट्रॅक करतं ही गोष्ट एव्हाना सर्वांना माहिती झालेली आहे. मात्र, यामध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे तुम्ही जरी गुगल सर्च वापरत नसाल किंवा गुगलची इतर कोणतीही सेवा वापरत नसाल, तरीही गुगल क्रोममुळे तुमच्या डिव्हाइसचा आयपी गुगलला माहिती होतो. परिणामी, तुम्ही VPN वापरत असलात तरीही तुमची सर्च अॅक्टिव्हिटी आपोआप गुगलकडे स्टोअर होते.

हे वाचा - मुंबईतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार;WhatsApp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच

जास्त प्रमाणात खर्च होते बॅटरी आणि डेटा -

गुगल क्रोम ब्राउझर आपल्या डिव्हाईसची रॅम (RAM) आणि बॅटरी (Battery) मोठ्या प्रमाणात वापरतो. जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की, गुगल क्रोममुळे तुमचा कॉम्प्युटर किंवा मोबाईलची बरीचशी बॅटरी ड्रेन होते. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Windows operating system) टास्क मॅनेजर ओपन करून तुम्ही ही गोष्ट पाहू शकता. याशिवाय, गुगल क्रोम किती रॅम वापरत आहे याचीसुद्धा तुम्हाला कल्पना येईल. ही बाब स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर दोन्हीमध्ये सारख्या प्रमाणात घडते.

गुगल क्रोमला प्रतिस्पर्धी नसल्यानं युजरर्सची संख्या जास्त -

गुगल क्रोमच्या (Google Chrome) प्रसिद्धी मागे 'गुगल' आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इंटरनेटवर सर्वत्र गुगलची सत्ता आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्च इंजिन, ब्राउझरपासून ते मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमपर्यंत टेक मार्केटमध्ये गुगलचा सर्वांत मोठा वाटा आहे. या शर्यतीत इतर कंपन्या अजिबात प्रभावी नाहीत. याचा अर्थ असा नाही की, इतर कुठले ब्राउझर चांगले नाहीत. असे अनेक वेब ब्राउझर सापडतील ज्यामध्ये चांगले प्रायव्हसी फोकस्ड फीचर्स उपलब्ध आहेत. मात्र, हे माहिती होण्यासाठी अशा ब्राउझर्सचा वापर होणं गरजेचं आहे. मात्र, गुगल आपल्या कॉम्पिटिशनमध्ये सहजासहजी कुणाला उतरू देत नाही.

गुगल कंपनी तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरवर झालेली सर्व अॅक्टिव्हिटी तुमच्या गुगल अकाउंटशी (Google Account) लिंक करून टाकतो. अशा परिस्थितीत, गुगलला तुमच्या लोकेशनसह प्रत्येक अॅक्टिव्हिटी ट्रॅक करता येते. तुमचा हाच डेटा वापरून कंपन्या तुम्हाला जाहिराती दाखवतात. कधीकधी या जाहिराती पाहून तुम्हाला गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी करण्याची इच्छा होते.

हे वाचा - Google वर दिवस-रात्र काय Search करतात तरुणी? ही लिस्ट एकदा पाहाच

इनकॉग्निटो मोडसुद्धा नाही सुरक्षित -

आपली सर्च अॅक्टिव्हिटी ट्रॅक होणार नाही या अपेक्षेनं बरेच लोक गुगल क्रोममधील इनकॉग्निटो मोड (Incognito Mode) वापरतात. मात्र, इनकॉग्निटो मोडमधील सर्च अॅक्टिव्हिटीसुद्धा ट्रॅक होते. इनकॉग्निटो मोडवरील डेटा गुगलकडं स्टोअर होतो. इनकॉग्निटोचा एकमेव फायदा म्हणजे ब्राऊझरवर ब्राउझिंग हिस्ट्री सेव्ह होत नाही. पण, गुगलवर तर ही ब्राउझिंग हिस्ट्री आपोआप सेव्ह केली जाते. त्यामुळे इनकॉग्निटो मोड पूर्णपणे सुरक्षित आहे, हा गैरसमज आहे असं म्हटलं तरी चालेल.

गुगल क्रोमचे एक्स्टेंशन्ससुद्धा ठरू शकतात डोकेदुखी -

गुगल क्रोम ब्राउझरचे एक्स्टेंशन्स तुमचं नुकसान करू शकतात. ज्या प्रकारे अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये गुगल प्ले स्टोअरवरून तुमच्या फोनमध्ये मालवेअर अटॅक होऊ शकतो तेच या ठिकाणीही शक्य आहे. गुगल क्रोमच्या एक्स्टेंशन्समध्ये (Google Chrome extensions) एखादा बग आढळून डेटाची चोरी झाल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडतातच. गुगल क्रोम एक्स्टेंशन्समुळे तुम्हाला फायदा होतोच पण नुकसानही होतं.

इंटरनेटवर गुगलचा कंट्रोल -

संपूर्ण इंटरनेटवर गुगलचं वर्चस्व असल्याची स्थिती आहे. साधी एखादी वेबसाइट जरी तयार करायची असेल तर तुम्हाला गुगलच्या गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतात. असं केल्याशिवाय तुमची वेबसाइट गुगल सर्चमध्ये किंवा क्रोम वेब ब्राउझरवर दिसणारच नाही. तुमची वेबसाइट गाईडलाईन्स फॉलो करत नाही हे लक्षात आल्यास ती क्रोमवरून ब्लॉक केली जाते.

हे वाचा - Alert! फ्री इंटरनेटच्या नावाखाली वसूली करतंय Facebook, तुम्हीही वापरताय का?

इतर ब्राउझर्सला संधी देण्याची गरज -

जर लोकांनी गुगल क्रोम व्यतिरिक्त दुसरे ब्राउझर वापरायला सुरुवात केली तर गुगलची ही मक्तेदारी चालणार नाही आणि इतर प्लेयर्सलाही संधी मिळेल. आपला डेटा कलेक्ट न करणारे काही ब्राउझर उपलब्ध आहेत. हे ब्राउझर्स सिक्युरिटी एस्कपर्ट्स आणि प्रायव्हसी अॅडव्होकेट्सकडून टेस्टेड आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. या ब्राउझरच्याही स्वतःच्या काही मर्यादा आहेत. हे ब्राउझर्स तुमची अॅक्टिव्हिटी ट्रॅक करत नाहीत त्यामुळे, तुम्हाला तुमच्या अॅक्टिव्हिटीवर आधारित जाहिराती दिसणार नाहीत. सर्च प्रेडिक्शनसुद्धा मिळणार नाहीत. पण, जर तुम्हाला प्रायव्हसी जास्त प्रिय असेल तर या उणीवांकडे दुर्लक्ष करता येऊ शकतं.

First published:

Tags: Finance, Google, Internet, Internet use, Privacy, Privacy leak, Ram, Tech news, Website