मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! फ्री इंटरनेटच्या नावाखाली वसूली करतंय Facebook, तुम्हीही वापरत नाही आहात ना?

Alert! फ्री इंटरनेटच्या नावाखाली वसूली करतंय Facebook, तुम्हीही वापरत नाही आहात ना?

मोफत इंटरनेट (Free Internet) देण्याच्या नावाखाली फेसबुकनं (Facebook Latest News) आता आपल्या युजर्सकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे.

मोफत इंटरनेट (Free Internet) देण्याच्या नावाखाली फेसबुकनं (Facebook Latest News) आता आपल्या युजर्सकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे.

मोफत इंटरनेट (Free Internet) देण्याच्या नावाखाली फेसबुकनं (Facebook Latest News) आता आपल्या युजर्सकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे.

  नवी दिल्ली, 28 जानेवारी: मोफत इंटरनेट (Free Internet) देण्याच्या नावाखाली फेसबुकनं (Facebook Latest News) आता आपल्या युजर्सकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या (The Wall Street Journal) बातमीमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि पाकिस्तान या विकसनशील देशांमध्ये या सोशल मीडिया कंपनी तेथील टेलिकॉम कंपन्यांशी (Telecom Companies) भागीदारी करून फेसबुक आणि इतर वेबसाइट्सचा विनामूल्य अॅक्सेस देतात. मेटा कनेक्टिव्हिटीद्वारे, फेसबुक आपल्या युजर्सला कम्युनिकेशन टुल्स, हेल्थ इन्फर्मेशन, एज्युकेशन रिसोर्स आणि इतर लो-बँडविड्थ सेवांचा फ्री अॅक्सेस देतं. 2013पासून फेसबुक ही सेवा देत आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंत 300 दशलक्षांपेक्षा जास्त लोकांना ही सेवा मिळाली आहे. पण, आता कंपनीनं युजर्सला सेल्युलर नेटवर्क कनेक्शन (Cellular network connection) देणाऱ्या कंपन्यांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

  अशी सुरू झाली समस्या

  प्रत्यक्षात ही समस्या फेसबुकच्या सॉफ्टवेअर आणि युजर इंटरफेसमधील व्हिडीओपासून सुरू झाली. हे व्हिडीओ पाहण्यासाठी युजर्सला आता शुल्क भरावं लागणार असल्याचं, युजर्सला माहिती देणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे. सुमारे 83 टक्के अनपेक्षित शुल्क या व्हिडीओंमधून फेसबुकला मिळत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं फ्री बेसिक्सच्या रुपात व्हिडीओ पाहू नये, असं रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. फेसबुकच्या सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी आढळून आल्यानं ही समस्या उद्भवल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बहुतेक ठिकाणी ही समस्या दूर करण्यात आल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे.

  हे वाचा-काय आहे FAME-II सबसिडी, कसा मिळतो Electric Vehicle खरेदीवर बंपर फायदा

  दोन डझनहून अधिक देशांना बसला फटका

  द वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एका महिन्यासाठी फ्री बेसिक्स वापरण्यासाठी शुल्क आकारलं जात आहे याची फेसबुकला कल्पना होती. बहुतेक युजर्सचे मोबाइल प्रीपेड प्लॅन (Prepaid plan) अॅक्टिव्ह असतात. त्यामुळं जोपर्यंत त्यांचा प्लॅन संपत नाही तोपर्यंत त्यांना चार्जेसबद्दल माहितीही होत नाही. फेसबुकचं फ्री इंटरनेट वापरण्यासाठी पाकिस्तानमधील युजर्सकडून एकूण 1.9 दशलक्ष डॉलर्स (14.23 कोटी) शुल्क जमा झाल्याचं बातमीमध्ये म्हटल आहे. वसुलीचा असा प्रकार दोन डझनहून अधिक देशांमध्ये सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

  विकसित देशांमध्ये फेसबुकची प्रगती खुंटली

  वॉल स्ट्रीट जर्नलनं आपल्या बातमीमध्ये म्हटलं आहे की, विकसित देशांमध्ये फेसबुकची प्रगती मोठ्या प्रमाणात रखडली आहे. कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या देशांमध्येच ते वाढत आहे. फेसबुक केवळ सोशल प्लॅटफॉर्म म्हणून नाही तर इंटरनेट प्रोव्हायडर (Internet Provider) म्हणूनही या देशांमध्ये काम करत आहे. त्याने या सर्व देशांमध्ये आपलं वाय-फाय स्थापित केलं आहे. फेसबुकने फ्री बेसिक्सप्रमाणेच डिस्कव्हर हे फिचरही सादर केलेले आहे.

  भारतानं 2016 मध्ये, फेसबुकच्या फ्री बेसिक्स (Free Basics) सेवेवर बंदी घातली होती. फ्री बेसिक्स सेवेमुळं नेट न्यूट्रॅलिटीच्या मूल्यांचं उल्लंघन करत असल्याचं कारण भारतानं दिलं होतं.

  First published:

  Tags: Facebook