मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मुंबईत राहणाऱ्या तरुणीच्या बाबतीत घडला विचित्र प्रकार; Whatsapp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच

मुंबईत राहणाऱ्या तरुणीच्या बाबतीत घडला विचित्र प्रकार; Whatsapp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच

तुमचा फोन सुरक्षित असला तरी त्यावरचं WhatsApp अकाउंट हॅक होऊ शकतं. मुंबईत राहणाऱ्या तरुणीच्या बाबतीत असा अनुभव नुकताच आला.

तुमचा फोन सुरक्षित असला तरी त्यावरचं WhatsApp अकाउंट हॅक होऊ शकतं. मुंबईत राहणाऱ्या तरुणीच्या बाबतीत असा अनुभव नुकताच आला.

तुमचा फोन सुरक्षित असला तरी त्यावरचं WhatsApp अकाउंट हॅक होऊ शकतं. मुंबईत राहणाऱ्या तरुणीच्या बाबतीत असा अनुभव नुकताच आला.

नवी दिल्ली, 31 जानेवारी : तुमचा फोन सुरक्षित असला तरी त्यावरचं WhatsApp अकाउंट (WhatsApp Account) हॅक होऊ शकतं. मुंबईत राहणाऱ्या तरुणीच्या बाबतीत असा अनुभव नुकताच आला. तिने इतरांना सावध करत WhatsApp वर आलेल्या कोणत्याही लिंक, मेसेजवर क्लिक न करण्याचं, तसंच कोणी पैसे मागितल्यास काय करावं याबाबत सांगितलं आहे.

या मुंबईतील तरुणीने आपला अनुभव शेअर करत सांगितलं, की तिच्या एका जवळच्या मैत्रिणीचा व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) पैसे पाठवण्याबाबत मेसेज आला. तरुणीने ही आपली जवळची मैत्रिण आहे म्हणून पैसे देण्यास होकार दिला. परंतु ज्यावेळी या तरुणीने पैसे पाठवत असल्याचं सांगितलं, तेव्हा तिच्या मैत्रिणीच्या व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे आपल्या नंबरवर न पाठवता एका दुसऱ्याच नंबरवर पाठवायला सांगितले. त्याचवेळी या तरुणीला काहीतरी संशय आला. आपल्या मैत्रिणीला पैसे हवे असताना, तिच्या अकाउंटवर न पाठवण्यामागे तिला काही संशयास्पद वाटलं. तिने लगेच ज्या मैत्रिणीने पैसे मागितले होते, तिला नॉर्मल कॉल केला. त्यावेळी आपल्या मैत्रिणीने पैसे मागितले नसल्याचं समोर आलं आणि तिचं WhatsApp Account हॅक (WhatsApp Account Hacked) झाल्याचंही समजलं.

महत्त्वाची बाब म्हणजे हॅकरने ज्या मुलीचं WhatsApp Account हॅक केलं होतं, त्या मुलीच्या WhatsApp वरुन तिच्या जवळच्या सर्व लोकांना केवळ 2400 रुपये पाठवण्याचा मेसेज करण्यात आला. रक्कम कमी असल्याने अनेकांना यामागे काही संशय आला नाही आणि तिच्या कुटुंबियांनी तसंच काही मित्रांनी तिला 2400 रुपये पाठवले. हे 2400 रुपये हॅकरने दिलेल्या दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात आले.

हे वाचा - हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा तुमचं WhatsApp Account, या सोप्या पद्धतीने करा Secure

परंतु आपल्या मैत्रिणीचा 2400 रुपये पाठवण्याचा मेसेज आल्यानंतर, ज्या तरुणीने अनुभव शेअर केला तिला आपली मैत्रिण दुसऱ्या नंबरवर पैसे पाठवायला का सांगते, ही बाब संशयास्पद वाटल्याने तिला थेट नॉर्मल कॉल केला आणि पैशांबाबत विचारणा केली. त्याचवेळी मैत्रिणीने आपण असे पैसे मागितले नसल्याचं सांगितलं आणि त्यानंतर आपलं WhatsApp Hacked झाल्याचं तिच्या लक्षात आलं.

हॅकरने त्या मैत्रिणीचं केवळ WhatsApp चं वापरलं नाही, तर तिच्या RedBus, Amazon अकाउंटवरुनही बस बुक करण्याचा, शॉपिंग करण्याचा प्रयत्न केला. हॅकरने जितके वेळा प्रयत्न केला, तितके वेळा OTP त्या तरुणीच्या फोनवर आला. आपल्या इतर अकाउंटलाही धोका असल्याचं समजल्यानंतर तिने फोन बंद करुन सीम कार्डही काढलं.

हे वाचा - Vishing Fraud: एका फोन कॉलने खाली होऊ शकतं बँक अकाउंट,या गोष्टी लक्षात ठेवाच

WhatsApp Hacked झाल्याचं समजल्यानंतर तिने सर्वात आधी आपलं सिम कार्ड काढून फोन बंद केला. तसंच WhatsApp Web वरुन WhatsApp Account लॉगआउट केलं. तसंच सर्व सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड्स, ऑनलाइन पेमेंट अ‍ॅपचे पासवर्ड्स बदलले.

त्यामुळे कोणीही WhatsApp वर मेसेज करुन पैसे पाठवण्याचं सांगितल्यास थेट समोरच्या व्यक्तीला कॉल करुन शहानिशा करा. तसंच कोणीही कोणत्याही गोष्टीच्या नावाने तुमच्या फोनवर आलेला ओटीपी (OTP) मागितल्यास कोणाशीही शेअर करू नका. तुमचे बँकिंग डिटेल्स, पासवर्ड्स, ओटीपी कोणालाही देऊ नका. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. तसंच जरी लिंकवर क्लिक केलं, तरी पुढील प्रोसेस करू नका. कोणतीही डिटेल्स, फॉर्म भरू नका.

First published:

Tags: Online fraud, Tech news, Whatsapp alert, WhatsApp user