नवी दिल्ली, 8 एप्रिल : भारतात कोणत्याही भारतीय नागरीकासाठी आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांना 12 अंकी विशिष्ट ओळख नंबर दिला जातो. यात व्यक्तीचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटोसह बायोमेट्रिकची माहिती असते. जर तुम्हाला आधार कार्डवरचा तुमचा फोटो आवडला नसेल, तर तो बदलता येऊ शकतो.
UIDAI आधी आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबरसह फोटोदेखील अपडेट करण्याची सुविधा ऑनलाईन देत होतं. परंतु आता ऑनलाईन प्रक्रिया केवळ पत्ता बदलण्यासाठी उपलब्ध आहे. बाकी इतर बदलांसाठी नाव, मोबाईल नंबर, जन्म तारीख, ई-मेल एड्रेस आणि फोटो बदलण्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया आहे. आधार कार्डवरचा फोटो बदलण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे आपल्या जवळच्या आधार केंद्रात जाणं आणि दुसरा पर्याय म्हणजे पोस्टाद्वारे फोटो बदलण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो.
आधार कार्डमध्ये फोटो बदलण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा -
- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर Get Aadhaar सेक्शनमध्ये आधार नामांकन/ अपडेट फॉर्म डाउनलोड करा.
- त्यानंतर फॉर्म योग्यरित्या भरा आणि तो आधार केंद्रात जाऊन जमा करा.
- आधार केंद्रात फिंगरप्रिंट्स, रेटीना स्कॅन आणि फोटो पुन्हा कॅप्चर केला आहे.
- आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावं लागेल.
- फोटो अपडेट करण्यासाठीचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर, एक यूआरएन किंवा अपडेट रिक्वेस्ट नंबर मिळेल.
- या नंबरद्वारे तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन ट्रॅक करू शकता.
- आवश्यक डेटा UIDAI कॉर्पोरेट डेटा ऑफिसला पाठवला जाईल. त्यानंतर अपडेटेड फोटोसह तुमचं आधार कार्ड 90 दिवसांत मिळेल.
पोस्टाद्वारे असा बदला फोटो -
- जर तुम्ही आधार केंद्रात जाऊ इच्छित नसाल, तर UIDAI च्या कार्यालयात पत्र लिहून आधार कार्डमध्ये अपडेट करता येऊ शकतं.
- त्यासाठी UIDAI च्या पोर्टलवर जाऊन ‘Aadhaar Card Update Correction’ फॉर्म डाउनलोड करा.
- या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
- त्यानंतर UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहा.
- या पत्रासह तुमचा Self attested photo, तुमच्या सहीसह अटॅच करा.
- दोन आठवड्यांमध्ये नव्या फोटोसह, नवं आधार कार्ड मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Aadhar card link, Tech news, UIDAI