आधार कार्ड म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला भारत सरकारतर्फे प्रदान केलं जाणारं अधिकृत ओळखपत्र आहे. आधार हा ओळखीचा कायदेशीर पुरावा मानला जातो. अर्थात हा फक्त भारतातल्या रहिवासाचा पुरावा आहे, नागरिकत्वाचा पुरावा नाही. आधार क्रमांक मिळाल्याने भारतातल्या अधिवासाचा (डोमिसाईल) हक्क प्रस्थापित होत नाही. आता ‘आधार’शिवाय कोणतंही सरकारी काम पूर्ण होऊ शकत नाही. सरकारच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. तसंच बँक खातं, मोबाइल सिम कार्ड, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजना, सार्वजनिक वितरणव्यवस्था अशा विविध खात्यांशी आधार संलग्न करणं बंधनकारक आहे. देशात