नवी दिल्ली, 6 एप्रिल : देशात आधार कार्ड बनवणारी संस्था UIDAI ने ट्वीटरवर महत्त्वाची माहिती दिली आहे. लहान मुलांसाठी बाल आधार कार्ड बनवण्याबाबत UIDAI ने सांगितलं आहे. हे आधार कार्ड 5 वर्षांखालील वयोगटातील मुलांसाठी बनवलं जातं. मुलांसाठी असलेल्या या आधार कार्डचा रंग निळा असून मुलं 5 वर्षांची झाल्यानंतर हे अमान्य होतं.
कसं आहे 'बाल आधार' -
यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, या बाल आधारमध्ये बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सारख्या आयरिस स्कॅन किंवा फिंगरप्रिंट स्कॅनची गरज नसेल. एक दिवसापासून ते पाच वर्षापर्यंतच्या बाळाचं बायोमेट्रिक घेतलं जात नाही. कारण 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बायोमेट्रिक बदलत असतं. परंतु मुलाचं वय 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला सामान्य आधार कार्ड दिलं जाईल, ज्यात सर्व बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट केले जातील.
एक दिवसाच्या बाळापासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आधार बनवताना केवळ दोन डॉक्यूमेंट्सची गरज असेल. मुलाचं बर्थ सर्टिफिकेट आणि आई-वडीलांपैकी एकाचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे.
5 वर्षाखालील मुलांसाठी कसं बनवाल बाल आधार?
- मुलांसोबत आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये जा. तेथे एक फॉर्म भरावा लागेल.
- सेंटरवर आई-वडिल आणि दुसऱ्या एकाचं जीवन प्रमाणपत्र घेऊन जावं लागेल.
- आधार सेंटरमध्ये मुलाचा फोटो काढला जाईल, जो Baal Aadhaar वर लावला जाईल.
- बाल आधार आई-वडीलांपैकी एकाच्या आधार कार्डशी लिंक केलं जाईल.
- मुलाचे कोणतेही बायोमेट्रिक डिटेल्स घेतले जाणार नाहीत.
- येथे आई-वडिलांपैकी एकाचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर द्यावा लागेल.
- वेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशनंतर कन्फर्मेशन नंबर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. कन्फर्मेशन मेसेज मिळाल्याच्या 60 दिवसांमध्ये आई-वडिलांच्या रजिस्टर्ड पत्त्यावर बाल आधार पाठवलं जाईल.
निळ्या रंगाचं असेल बाल आधार -
हे निळ्या रंगाचं आधार कार्ड सामान्य आधार कार्डप्रमाणेच मान्य आहे. नव्या नियमानुसार, UIDAI ने निळ्या रंगाचं आधार 5 वर्षांखालील मुलांसाठी जारी केलं आहे. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे आधार कार्ड अमान्य होईल आणि त्यानंतर जवळपासच्या आधार केंद्रात जाऊन त्याच आधार क्रमांकासह बायोमेट्रिक तपशील पूर्ण करावे लागतील. अन्यथा हे आधार अवैध ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.