नवी दिल्ली, 8 एप्रिल: एखाद्या सरकारी विभागात काही काम असल्यास, अनेकांना मोठ्या त्रासाला सोमोरं जावं लागतं. एका कामासाठी सतत फेऱ्या माराव्या लागतात. सरकारी विभागातील मोठ्या रांगा, सावकाश होणारी प्रोसेस ही नेहमीचीच एक समस्या आहे. परंतु काही असे अॅप्स आहेत, जे काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतात.
आरोग्य सेतू (Arogya Setu) -
कोरोना व्हायरस संक्रमणादरम्यान आरोग्य सेतू सर्वात महत्त्वाचं अॅप ठरलं आहे. प्रवासापासून ते एखाद्या सरकारी परिसरात प्रवेश करण्यापर्यंत आरोग्य सेतू अॅप गरजेचं ठरतं. त्याशिवाय केंद्र सरकारने सुरू केलेल्या कोरोना व्हायरस लसीकरणासाठीही या अॅपचा वापर होतो आहे. या अॅपद्वारे आपल्या कुटुंबियांसाठी सहजपणे लसीकरणासाठी अपॉईंटमेंट घेता येऊ शकते.
MyGov App -
MyGov App हेदेखील महत्त्वाचं अॅप ठरतं. या अॅपमध्ये सरकारी विभागांची माहिती उपलब्ध आहे. तसंच सरकारी कामासाठी आवश्यक सूचनाही उपलब्ध यात उपलब्ध आहेत.
Umang App -
Umang App अर्थात Unified Mobile Application For New-Age Governance अतिशय महत्त्वाचं आहे. या अॅपमध्ये हेल्थकेअर, फायनान्स आणि हाउसिंगशी संबंधित माहिती मिळवता येते. त्याशिवाय पीएफशी संबंधितही माहिती यात उपलब्ध आहे. सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यतेची माहितीही या अॅपमध्ये उपलब्ध आहे.
Digilocker App -
डेटा लीक आणि प्रायव्हसीबाबतची वाढती प्रकरणं पाहता केंद्र सरकारने खास Digilocker App लाँच केलं आहे. या अॅपमध्ये युजर्स आपल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी ठेवू शकतात.
mParivahan App -
हेदेखील एक आवश्यक सरकारी अॅप आहे. या अॅपच्या मदतीने युजर्स आपल्या कार आणि बाईकचे डिटेल्स जाणून घेऊ शकतात. तसंच या अॅपमध्ये युजर्सला आपल्या कार किंवा बाईकची आवश्यक डॉक्युमेंट ठेवता येऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Application, Apps, Government apps, Smartphone