Gmail किती वेबसाईटवर लिंक आहे, असं तपासा; Delink करण्यासाठी पाहा सोपी प्रोसेस

कितीतरी वेबसाईट्स, अकाउंट्सद्वारे जीमेल लिंक केलेलं असू शकतं, ज्याची तुम्हालाही माहिती नसेल, त्यामुळे एखादी वेबसाईट तुमच्या वापरात नसेल, तर जीमेल त्या वेबसाईटवरुन डिलिंक (Delink) करता येऊ शकतं.

कितीतरी वेबसाईट्स, अकाउंट्सद्वारे जीमेल लिंक केलेलं असू शकतं, ज्याची तुम्हालाही माहिती नसेल, त्यामुळे एखादी वेबसाईट तुमच्या वापरात नसेल, तर जीमेल त्या वेबसाईटवरुन डिलिंक (Delink) करता येऊ शकतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 मे : अनेकदा एखाद्या नव्या वेबसाईटवर (Website) रजिस्टर करताना युजरला जीमेलच्या (Gmail) माध्यमातून त्या वेबसाईटवर लॉगइन (log In) करावं लागतं. त्या वेबसाईटचा वापर झाल्यानंतर, पुढे त्याचा वापर केला जात नाही. पण आपलं जीमेल मात्र त्या वेबसाईटला लिंकच राहतं. अशाप्रकारे तुम्ही कितीतरी विविध वेबसाईट्स, अकाउंट्सद्वारे जीमेल लिंक केलेलं असू शकतं, ज्याची तुम्हालाही माहिती नसेल, त्यामुळे एखादी वेबसाईट तुमच्या वापरात नसेल, तर जीमेल त्या वेबसाईटवरुन डिलिंक (Delink) करता येऊ शकतं. Gmail Account कुठे-कुठे, किती वेबसाईटवर लिंक आहे असं तपासा - - सर्वात आधी मोबाईच्या Gmail App वर नाही, तर Google Crome वर Gmail ओपन करावं लागेल. - तुमचा Gmail ID आणि पासवर्ड टाकावा लागेल. - गुगल क्रोमवर लॉगइन केल्यानंतर एका नॉर्मल पेज येईल. इथे स्क्रोल (Scroll) करत सर्वात खाली जावं लागेल. - इथे View Gmail in (Mobile/ Older Version/ Dekstop) दिसेल. - त्यानंतर डेस्कटॉपवर (Dekstop) क्लिक करावं लागेल. त्यानंतर ज्याप्रमाणे डेस्कटॉपवर जीमेल दिसतात, त्याचप्रमाणे Mails दिसतील. या पेजवरही खाली Scroll करावं लागेल.

  (वाचा - असा करा Oximeter चा योग्य वापर, अचूक समजेल Oxygen Level)

  - त्यानंतर Last Account Acitvity वर जावं लागेल. आता डिटेल्सवर क्लिक करा. त्यानंतर Security Checkup वर क्लिक करा. सर्वात खाली Your Saved Password दिसेल. - इथे Gmail अकाउंट किती वेबसाईट आणि App शी लिंक आहे, ते समजेल. - पुढे Go to Password Checkup वर क्लिक करावं लागेल, त्यानंतर Gmail Id चा पासवर्ड टाकावा लागेल.

  (वाचा - अलर्ट! Review पाहून Online Shopping करताय; मग आधी हे वाचाच)

  - इथे सर्व apps आणि websites ची माहिती मिळेल, जिथे तुमचं जीमेल अकाउंट लिकं आहे. इथेच साईड पॅनल क्लिक करुन ते लॉगआउट करू शकता.
  Published by:Karishma Bhurke
  First published: