नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : गुगलचं (Google) ईमेल शेड्यूलिंग फीचर फायद्याचं ठरतं. ईमेल शेड्यूलिंग फीचर, ईमेल आपल्या हवं त्या वेळेत, हवं त्या तारखेला पाठवण्याची परवागनी देतं. गुगलने एप्रिल 2019 रोजी जीमेलमध्ये (Gmail) हे फीचर लाँच केलं होतं. Gmail वर ईमेल शेड्यूलिंग मोबाईल अॅप आणि डेस्कटॉप ब्राउजर दोन्हीवरही उपलब्ध आहे.
या फीचरचा वेगवेगळ्या स्थितीत उपयोग होऊ शकतो. केवळ सेंडरलाच ईमेल शेड्यूल केला आहे याची माहिती मिळते. जीमेलवर, मेल शेड्यूल करणं अतिशय सोपं असून काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन हे काम करता येतं.
डेस्कटॉप ब्राउजर -
- Gmail ओपन करा आणि कंपोजवर क्लिक करा. ईमेल आयडीसह मेल ड्राफ्ट करा.
- आता सेंडवर क्लिक न करता, सेंड बटणाच्या बाजूला असलेल्या छोट्या ड्रॉप डाउन अॅरोवर क्लिक करा आणि शेड्यूल सेंड निवडा.
मोबाईल ईमेल शेड्यूल -
- Android किंवा iOS वर Gmail ओपन करा,
- कंपोजवर क्लिक करुन रिसिव्हरचा ईमेल आयडी टाकून मेल टाईप करा.
- वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करुन शेड्यूल सेंडवर टॅप करा.
- अधिकतर 100 मेल शेड्यूल करता येऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.